चार कोटीच्या हायड्रोपोनिक गांजासह तिघांना अटक

अंधेरी येथे दया नायक व त्यांच्या पथकाची कामगिरी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
4 जुलै 2025
मुंबई, – सुमारे चार कोटीच्या हायड्रोपोनिक गांजासह तिघांना गुन्हे शाखेच्या युनिट नऊच्या अधिकार्‍यांनी अटक केली. शुभ ललितकुमार सिरोया, हर्ष हितेश चौक्सी आणि सिद्धांत अरविंद शेट्टी अशी या तिघांची नावे आहेत. या कारवाईत पोलिसांनी चार कोटी पाच लाख सत्तर हजार रुपयांचे 4.057 किलो अमेरिकन डायड्रोपोनिक गांजासह 38 हजाराची कॅश आणि साडेतीन लाख रुपयांचे पाच महागडे मोबाईल असा चार कोटी नऊ लाख अठ्ठावन हजाराचा मुद्देमाल जप्त केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांनी सांगितले. तिन्ही आरोपी अंधेरी-विलेपार्ले येथील रहिवाशी असून सिद्धांत शेट्टी हा हॉटेल व्यावसायिक आहे. अटकेनंतर या तिघांनाही किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

गुरुवारी रात्री वांद्रे युनिटचे अधिकारी आणि कर्मचारी अंधेरी परिसरात गस्त घालत होते. अंधेरीतील जे. बी नगर परिसरात गस्त घालताना पोलिसांना तीन तरुण संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आले. त्यामुळे या तिघांनाही पोलिसांनी पळून जाण्याची कुठलीही संधी न देता चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना अमेरिकन हायड्रोपोनिक गांजा सापडला. त्यांच्या चौकशीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक व त्यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सचिन पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्कर्ष वझे, महेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुजीत म्हैसधुणे व अन्य या पथकाने व्ही. एम शाह मार्ग, जे. बी नगर, गोकुळ रिजन्सी इमारतीच्या फ्लॅट क्रमांक 303 मध्ये छापा टाकला होता. यावेळी तेथून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अमेरिकन हायड्रोपोनिक गांजाचासह कॅश आणि पाच मोबाईल जप्त केले आहे.

जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत 4 कोटी 9 लाख 58 हजार रुपये आहेत. याच गुन्ह्यांत नंतर शुभ सिरोया, हर्ष चौक्सी आणि सिद्धांत शेट्टी या तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील शुभ सिरोया आणि हर्ष चौक्सी हे विलेपार्ले तर सिद्धांत हा अंधेरी येथे राहत असून तो हॉटेल व्यावसायिक आहे. अटकेनंतर या तिघांनाही शुक्रवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिघांना हा साठा कोणी दिला, गांजा ते कोणाला देणार होते. यापूर्वीही त्यांनी अमेरिकेन हायड्रोपोनिक गांजासह इतर ड्रग्जची खरेदी-विक्री केली आहे का, या गुन्ह्यांत त्यांचे इतर कोणी सहकारी आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page