इतर राज्यातून आणलेल्या घातक शस्त्रांसह दोघांना अटक
देशी पिस्तूल, जिवंत काडतुसे, मोबाईल जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – इतर राज्यातून आणलेल्या घातक शस्त्रांसह दोघांना गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. कुंदन जगदीश सहानी आणि गणेश रमाकांत शर्मा अशी या दोघांची नावे आहेत. या कारवाईत पोलिसांनी एक देशी बनावटीचे देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, दोन मोबाईल जप्त केले आहेत. घातक शस्त्रांची विक्रीसह बाळगणे या कलमांतर्गत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत ते दोघेही कोठडीत आहेत.
गेल्या काही दिवसांत इतर राज्यातून आणलेल्या घातक शस्त्रांची विक्री करणार्या आरोपीविरुद्ध स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना साकिनाका परिसरात काहीजण घातक शस्त्रांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी, तोडकर, नार्वेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कांबळे, पोलीस हवालदार जगताप, पानसरे, पोलीस शिपाई डफळे, निर्मळे, चव्हाण यांनी साध्या वेशात पाळत ठेवली होती. मंगळवारी तिथे कुंदन सहानी आणि गणेश शर्मा हे दोघेही आले होते. त्यांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना एक पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, दोन मोबाईल सापडले. तपासात ते दोघेही पिस्तूलची विक्रीसाठी तिथे आल्याचे सांगितले. मात्र शस्त्रांची विक्री करण्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांचयाविरुद्ध पोलिसांनी घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांनी ते पिस्तूल कोेठून आणले, पिस्तूल ते कोणाला देणार होते, यापूर्वीही त्यांनी घातक शस्त्रांची विक्री केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.