मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – जुन्या वादातून झोपेत असलेल्या जुमराती मोहम्मद शेख या व्यक्तीची त्याच्याच मित्राने दगडाने ठेवून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या मारेकर्याला जे. जे मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. शंकर सोनावणे ऊर्फ दामू असे या मारेकर्याचे नाव असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना सोमवार सायंकाळी सव्वापाच वाजता मेमनवाडा फ्लोअर मिलजवळील शालिमार हॉटेल, फायर बिग्रेडसमोर झाला. याच परिसरात जुमरात शेख हा राहतो. सोमवारी सायंकाळी शुस्त्री इमारत, रुहानी इम्पेक्ससमोरील फुटपाथवर झोपला होता. यावेळी तिथे शंकर सोनावणे आला आणि त्याने जुन्या वादातून जुमरातीच्या डोक्यात दगडाने हल्ला केला होता. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. ही माहिती मिळताच जे. जे मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या जुमरातीला तातडीने जे. जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुनिल वारंगुळे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच शंकर सोनावणे याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच ही हत्या केल्याची कबुली दिली. शंकर हा कळवा येथील साईबाबा मदिर, मुकूंद कंपनी रोड परिसरात राहत असून स्पिकर बनविण्याचे काम करतो. जुमराती हा त्याचा परिचित असून गेल्या आठवड्यात त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. याच वादातून रागाच्या भरात त्याने झोपेत असलेल्या जुमराती याची दगडाने ठेचून हत्या केली होती. या हत्येनंतर तो पळून गेला होता. मात्र हत्येचा गुन्हा दाखल होताच त्याला काही तासांत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बुधवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.