विविध गुन्ह्यांतील 1 कोटी 66 लाखांचा मुद्देमाल मालकांना परत
चोरीसह गहाळ झालेली मालमत्ता परत मिळाल्याने आनंदाचे वातावरण
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
13 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – विविध गुन्ह्यांतील 1 कोटी 66 लाखांचा मुद्देमाल 237 मूळ मालकांना परत करण्यात आला. वांद्रे येथील बीकेसी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमांक पोलीस उपायुक्त मनिष कलवानिया यांनी मूळ मालकांना त्यांचा मुद्देमाल परत केला होता. चोरीसह गहाळ झालेली मालमत्ता परत मिळाल्याने तक्रारदारांनी परिमंडळ आठमधील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांचे आभार व्यक्त केले. अनेकांच्या चेहर्यावर मुद्देमाल परत मिळाल्याचा आनंद स्पष्टपणे दिसत होता.
गेल्या काही महिन्यांत परिमंडळ आठच्या हद्दीतील बीकेसी, खेरवाडी, निर्मलनगर, वाकोला, विलेपार्ले, सहार आणि विमानतळ पोलीस ठाण्यात विविध सोनसाखळी, मोबाईल, वाहन चोरीसह इलेक्ट्रॉनिक वस्तूसह कॅश आदी मुद्देमाल चोरीसह गहाळ झाल्याची नोंद झाली होती. हा मुद्देमाल जप्त करण्यासाठी तसेच संबंधित गुन्ह्यांतील आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यात पोलिसांना यश आले होते. काही गुन्ह्यांची उकल करुन पोलिसांनी गुन्ह्यांतील आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात चोरीसह गहाळ झालेला मुद्देमाल हस्तगत केला होता.
हा मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यासाठी वांद्रे येथील बीकेसी, पासयादान हॉलमध्ये एका विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस उपायुक्त मषि कलवानिया यांच्या हस्ते 237 मूळ मालकांना त्यांचा चोरीसह गहाळ झालेला मुद्देमाल परत करण्यात आला. त्यात सोनसाखळी, मोबाईल, वाहन, मौल्यवान दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कॅश आदी 1 कोटी 66 लाख 46 हजार 211 रुपयांचा मुद्देमालाचा समावेश होता. कुठलीही शाश्वती नसताना चोरीसह गहाळ झालेला मुद्देमाल परत मिळाल्याने अनेकांनी आनंद मानून परिमंडळ आठच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांचे आभार व्यक्त केले होते.