भांडणात मध्यस्थी करणार्या 45 वर्षांच्या प्राणघातक हल्ला
चारही आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा; दोघांना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 मार्च 2025
मुंबई, – भांडणात मध्यस्थी करणार्या अंजुनादेवा भीमराव बेगर या 45 वर्षांच्या व्यक्तीवर चारजणांच्या टोळीने चाकूसह स्टॅम्पने प्राणघातक हल्ला केल्याची घटना विक्रोळी परिसरात घडली. या हल्ल्यांत अंजुनादेवा हा गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याला राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी चारही आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या दोघांना विक्रोळी पोलिसांनी अटक केली तर पळून गेलेल्या दोघांचा शोध सुरु आहे. शहाद शेख, आतिक अब्बास शेख, शहानवाज शेख आणि अब्बास शेख अशी या चौघांची नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता विक्रोळीतील ग्रुप क्रमांक तीन, टागोरनगर, हरियाली व्हिलेजच्या संजय गांधी नगरात घडली. याच परिसरात अंजुनादेवा बेगर हा राहतो. सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता हरियाली व्हिलेज, संजय गांधी नगर येथे काही तरुणांमध्ये भांडण सुरु होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्यांच्यातील भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला होता. भांडणात मध्यस्थी केली म्हणून रागाच्या भरात चारजणांच्या टोळीने त्याच्यावर चाकूसह स्टॅम्पने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्याच्या हाताला, डोक्याला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली होती. जखमी झालेल्या अंजुनादेवा याला स्थानिक रहिवाशांनी तातडीने राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे.
ही माहिती मिळताच विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी चारही हल्लेखोरांविरुद्ध पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या दोघांना काही तासांत पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहे. त्यांचे इतर दोन सहकारी पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.