शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन महिलेवर लैगिंक अत्याचार
६६ वर्षांच्या वयोवृद्ध हिरे व्यापार्याला अटक व कोठडी
अरुण सावरटकर
३१ मार्च २०२४
मुंबई, – शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन एका ४० वर्षांच्या महिलेने तिच्याच परिचित हिरे व्यापार्याने नैसगिंक व अनैसगिक लैगिंक अत्याचार करुन तिचे अश्लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच वॉण्टेड असलेल्या अरविंद हुल्हासमल कासलीवाल ऊर्फ अरविंद जैन या ६६ वर्षांच्या हिरे व्यापार्याला आंबोली पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. अरविंद जैनला अलीकडेच ६६ लाख रुपयांचया हिर्यांचा अपहार करुन एका व्यापार्याची फसवणुक केल्याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याच्यावर लैगिंक अत्याचाराच्या गुन्ह्यांत अटकेची कारवाई झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
४० वर्षांची पिडीत महिला मालाडच्या मालवणी परिसरात तिच्या चौदा वर्षांच्या मुलासोबत राहते. ती अंधेरीतील एका ज्वेलरी कंपनीत कामाला असून या कंपनीत हिर्यासह सोन्याचे दागिने बनविले जातात. या कामासाठी तिला कंपनीच्या विविध ग्राहकांना भेटावे तसेचच अनेकदा ग्राहकांच्या कार्यालयासह घरात दागिने घेऊन जावे लागत होते. त्यांच्या कंपनीचा अरविंद जैन हा एक ग्राहक असून त्याच्या मालकीचे वांद्रे येथील बीकेसी परिसरात इन्ना एक्सपोर्ट नावाची एक कंपनी आहे. तिच्या कंपनीत तो पार्टनर आहे. मे २०२३ रोजी ती अरविंद जैनच्या अंधेरीतील व्हिक्टोरिया अपार्टमेंटच्या बी/२४ च्या फ्लॅट ४०६ मध्ये कामानिमित्त आली होती. यावेळी अरविंद त्याच्या घरी एकटाच होता. ही संधी साधून त्याने तिला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले होते. ती बेशुद्ध होताच त्याने तिला बेडरुममध्ये आणून तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. या लैगिंक अत्याचाराचे त्याने त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडीओ बनविला होता. शुद्धीवर आल्यानंतर हा प्रकार समजताच तिने अरविंदशी वाद घालून जाब विचारण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याने तिला तिचे अश्लील व्हिडीओ बनविले असून कोणालाही काहीही सांगितले तर तिचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची तसेच तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. जून महिन्यांत त्याने तिला तिचा अश्लील व्हिडीओ पाठवून तिला मालाड येथील एका हॉटेलमध्ये बोलाविले होते. तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर पुन्हा लैगिंक अत्याचार केला होता. त्यानंतर तो तिला सतत धमकी देऊन तिच्यावर जबदस्तीने नैसगिक व अनैसगिंक लैगिंक अत्याचार करत होता. त्यामुळे ती प्रचंड मानसिक तणावात होती.
याच दरम्यान त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिची काळजी घेण्याचे आश्वासन दिले होते. ऑक्टोंबर २०२३ रोजी ती तिच्या नातेवाईकांकडे हैद्राबाद येथे गेली होती. यावेळी अरविंद तिला सतत कॉल करुन मानसिक त्रास देत होता. याबाबत तिच्या मावस बहिणीने तिच्याकडे विचारणा केली होती. त्यामुळे तिने तिला घडलेला प्रकार सांगितला. काही दिवसांनी ती तिच्या बहिणीसोबत मुंबईत आली होती. यावेळी या दोघींनी तिच्या कंपनीच्या मालकाची भेट घेऊन त्यांना हा प्रकार सांगून अरविंद जैन हा तिला तिचे अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार करत असल्याचे सांगितले. ही माहिती ऐकून त्यांना धक्काच बसला होता. त्यामुळे त्यांनी तिला पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे तिने आंबोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना हा प्रकार सांगून तिथे अरविंद जैनविरुद्ध तक्रार केली होती. त्यात तिने अरविंदने तिच्यावर मे ते ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत त्याच्या घरी शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन लैगिंक अत्याचार केला आणि नंतर तिचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मालाड आणि मालवणीतील विविध हॉटेलमध्ये तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून अनैसगिंंक लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत तिच्या तक्रारीवरुन अरविंद जैनविरुद्ध ३७६ (२), ३७६ (एन), ३७७, ३२८, ५०६ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच त्याला बीकेसी पोलिसांनी हिर्यांच्या फसवणुकीच्या एका गुन्ह्यांत अटक केल्याचे समजले होते.
याच गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडीत असलेल्या अरविंद जैनची आंबोली पोलिसांनी वांद्रे येथील लोकल कोर्टात कस्टडीची मागणी केली होती. ही मागणी मान्य होताच त्याला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. गेल्याच आठवड्यात अरविंद जैनला विक्रीसाठी घेतलेल्या ६३ लाख रुपयांच्या हिर्यांचा अपहार करुन एका हिरे व्यापार्याची फसवणुक केल्याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत तो गेल्या तीन महिन्यांपासून वॉण्टेड होता. अटकेनंतर पोलीस कोठडीत असताना त्याने पिडीत महिलेवर लैगिंक अत्याचार केल्याचे सांगितले होते. तिचे अश्लील व्हिडीओ बनवून त्याने तिला ब्लॅकमेल केले आणि त्याच्या घरासह विविध हॉटेलमध्ये तिच्यावर नैसगिक व अनैसगिंक लैगिंक अत्याचार केल्याची कबुली दिली होती. दरम्यान पिडीत महिलेची वैद्यकीय चाचणी झाली असून लवकरच आरोपीची वैद्यकीय चाचणी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.