About Us

सर्वांना नमस्कार. आपल्या आर्शिवादाची गरज
नमस्कार, मी अरुण बाबाजी सावरटकर गेली २७ वर्ष क्राईम पत्रकारीता करतोय. या कालावधीत मुंबई तरुण भारत, वृत्तमानस, पुढारी, नवाकाळ, प्रहार, जनशक्ती, प्रभात, नवशक्ती, आपल महानगर, पुण्यनगरी, मुक्तपीठ आदी दैनिकासह वेब पोर्टलसाठी काम केले. पत्रकार म्हणून काम करताना अनेकांशी चांगले संबंध निर्माण झाले, त्याचा रिपोटींगसाठी चांगला फायदा झाला. अनेक प्रसंगात चांगले-वाईट अनुभव आले, मात्र चांगली गोष्ट घेऊन वाईट अनुभवातून शिकत पुढे गेलो. क्राईम रिपोटींग करताना स्वतचे काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. आपण काहीतरी नवीन सुरु करायचं तर क्राईमच्या सर्वाधिक बातम्या देणारे वेब पोर्टल सुरु करायला काय हरकत आहे असा विचार आला. त्यात माझा हिंतचितक आणि मित्र आबा माळकर आणि वरिष्ठ सहकारी पत्रकार मित्र राजू परुळेकर यांची साथ मिळाली. अखेर वेब पोर्टल सुरु करण्याचा मुहूर्त ठरला. मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम नाव सुचले आणि याच नावाने वेब पोर्टल करण्याचा निर्णय घेतला. कुठलही चांगल्या कामाची सुरुवात गणरायाच्या नावाने होते, माझ्या आयुष्यात गणपती बाप्पाचे विशेष स्थान आहे. त्यामुळे वेब पोर्टलची सुरुवात १३ फेब्रुवारी २०२४ रोजी म्हणजेच माघी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सुरु करण्याचा निर्णय झाला. आज आपल्या सेवेत माझे क्राईमचे वेब पोर्टल सुरु करताना नक्कीच आनंद होत आहे. माझ्यावर प्रेम करणार्‍या, सतत माझ्या पाठिशी उभे राहणार्‍या माझ्या मित्रांनी, पोलीस अधिकारी, सहकारी आणि इतर ज्ञात-अज्ञात हिंतचितकांनी अशा प्रकारे मला साथ द्यावी. तुमच्या आर्शिवार्द, सहकार्याच्या जोरावर मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम नक्कीच यशाचे शिखर गाठेल अशी आशा बाळगतो.
मुख्य संपादक
अरुण बाबाजी सावरटकर

You cannot copy content of this page