रेल्वे स्थानकातील दशहतवादी व्हिडीओ व्हायरलप्रकरणी गुन्हा दाखल
एआयच्या माध्यमातून व्हिडीओ बनवून दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१७ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – कांदिवली रेल्वे स्थानकातील दहशतवादी व्हिडीओ व्हायरलप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बोरिवली रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एआयच्या माध्यमातून बोगस व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करुन अज्ञात व्यक्तीने सर्वसामान्यामध्ये भीतीचे, दशहतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. व्हिडीओ व्हायरल करणार्या आरोपीचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी शोध घेत आहेत.
गणेश यशवंत यादव हे पोलीस उपनिरीक्षक असून सध्या ते बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. सोमवारी ते वरिष्ठांच्या आदेशावरुन एटीसी शाखेत कर्तव्य बजावत होते. याच दरम्यान त्यांना दुपारी अडीच वाजता पोलीस आयुक्त कार्यालयातून एटीबी शाखेतील अंमलदार मैत्री यांनी कॉल केला होता. त्यांनी त्यांना एक व्हिडीओ पाठविला होता. त्यात कांदिवली रेल्वे स्थानकात एक पाकिस्तानी दशहतवादी फिरत असून हा व्हिडीओ इंटाग्रामवर व्हायरल होत असल्याचे सांगण्यात आले.
त्यांनी तो व्हिडीओ पाहिला असता तो व्हिडीओ पाच सेकंदचा होता. व्हिडीओमध्ये ब्रेकिंग न्यूज कांदिवली स्टेशन पर पाकिस्तान आतंकी एके ४७ लेकर अकेला घुमता दिखा, पुरेश स्टेशन पर दशहत, माहोल हुआ तणावपूर्ण, सुरक्षा एजेसिंया अलर्ट. स्टेशन पर हडकंप, रेल्वे पोलीस आणि एटीसी की टिम मौके पर, आरोपी की तलाश असा मजकूर होता. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती बंदूक घेऊन स्टेशनवर फिरताना चित्र दिसत होते. या घटनेनंतर गणेश यादव यांनी त्यांच्या वरिष्ठांना ही माहिती दिली होती.
या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत रेल्वे पोलिसांसह आरसीएफला पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस पथक कांदिवली रेल्वे स्थानकात गेले होते. संशयित दहशतवाद्याचा शोध घेत पोलिसांनी रेल्वे स्थानकातील सर्व सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली होती. या फुटेजची पाहणी केली असता अशा प्रकारे कोणीही व्यक्ती एके घेऊन फिरत नसल्याचे दिसून आले नाही किंेवा तिथे काहीही संशयास्पद घटना दिसून आली नाही. त्यामुळे तो व्हिडीओ सायबर सेल पोलिसांकडे सोपविण्यात आला होता. सोशल मिडीयावर व्हायरल झालेला तो व्हिडीओ काढून टाकण्यात आला होता.
सायबर सेल पोलिसांनी केलेल्या तपासात तो व्हिडीओ एआयच्या माध्यमातून बनविण्यात आला होता. बोगस व्हिडीओ बनवून अज्ञात व्यक्तीने तो व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करुन सर्वसामान्यामध्ये भीतीचे दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार उघडकीस येताच गणेश यादव यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत. सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल करणार्या अज्ञात व्यक्तीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.