विदेशी महिलेसह मैत्रिणीशी लैगिंक चाळे केल्याप्रकरणी मजासरला अटक
मसाजदरम्यान मोबाईलवरुन फोटोसह व्हिडीओ काढल्याचा आरोप
अरुण सावरटकर
१८ डिसेंबर २०२४
मुंबई, – भारतात टुरिस्ट व्हिसावर आलेल्या एका स्पॅनिश महिलेसह तिच्या मैत्रिणीचा विनयभंगासह लैगिंक अश्लील चाळे केल्याप्रकरणी लक्ष्मण संतराम कुमार या ३७ वर्षीय मसाजरला मालवणी पोलिसांनी अटक केली. आयुवैदिक मसाज करताना त्याने या दोघींची त्याच्या मोबाईलवर फोटोसह व्हिडीओ काढल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आला आहे.
३३ वर्षांची पिडीत महिला स्पॅनिश नागरिक असून ती नोव्हेंबर २०२४ टुरिस्ट व्हिसावर भारतात आली होती. तिच्या व्हिसाची मुदत ६ मार्च २०२५ असा आहे. या कालावधीत ती बंगलोर येथे वास्तव्यास होता. सोमवारी तिने सोशल साईटवरुन आयुवैदिक मसाज करणार्या लक्ष्मणला संपर्क साधला होता. यावेळी तिने त्याला मसाजसाठी तिच्या मैत्रिणीच्या मालवणीतील मढ परिसरातील राहत्या घरी बोलाविले होते. तो स्त्री-पुरुष दोघांसाठी एक थेरिपिस्ट म्हणून काम करत होता. ठरल्याप्रमाणे सोमवारी तो तिच्या मैत्रिणीच्या घरी आला होता. सुरुवातीला त्याने तिच्या मैत्रिणीला सेवा देण्यास सुरुवात केली होती. मसाज करताना त्याने अश्लील स्पर्श तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्याकडून चुकून हा प्रकार घडल्याचे समजून तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते.
काही वेळानंतर त्याने तक्रारदार महिलेला मसाज करण्यास सुरुवात केली होती. यावेळी त्याने तिच्या मैत्रिणीप्रमाणे तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या पायाच्या दिशेने मसाज करताना तिने त्याच्याकडे पाहिले. यावेळी त्याच्या बाजूलाच टेबलावर त्याचा मोबाईल होता. त्याने मसाज करताना तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढल्याचा तिला संशय आला होता. काही वेळानंतर त्याने हातांना, खांद्यांना मसाज करुन तिच्या गुप्त भागावर अश्लील स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिने त्याला थांबवून स्वतपासून दूर केले होते. यावेळी तिने त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने उडवाउडवीचे उत्तर देऊन तिला टाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांचा मित्र दुसर्या रुममध्ये होता. तिने त्याला त्याच्या मोबाईलमध्ये काही फोटो किंवा व्हिडीओ असल्याचा संशय व्यक्त करुन त्याच्या मोबाईलची पाहणी करण्यास सांगतले. त्यामुळे त्याने त्याच्याकडे त्याच्या मोबाईलची मागणी केली, मात्र त्याने मोबाईल देण्यास नकार दिला. त्यानंतर त्याला सुरक्षारक्षकाला बोलावून घराबाहेर काढण्यात आले.
घडलेल्या प्रकारानंतर तिने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमच्या ११२ आणि १०० क्रमांकावर हा प्रकार सांगून पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर स्पॅनिश महिलेची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. यावेळी तिच्यासोबत तिची मैत्रिण, मित्र आणि वकिल होते. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी मसाजर लक्ष्मण कुमारविरुद्ध ६४, ७५ (१) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला मंगळवारी रात्री अतिरिक्त न्याय दंडाधिकारी न्यायालयाचे न्या. चिकणे यांच्या समक्ष हजर करण्यात आले होते. यावेळी न्या. चिकणे यांनी त्याला २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
लक्ष्मण हा अंधेरीतील वर्सोवा परिसरात राहत मसाजर म्हणून काम करतो. सोशल मिडीयावर त्याने स्वतचा मोबाईल अपलोड केला असून मागणीनुसार तो ग्राहकांच्या घरी आयुवैदिक मसाज करण्यासाठी जात असल्याचे पोलिसांनी सागितले. त्याचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून तो फॉन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आला आहे. त्याने पिडीत महिलेसह तिच्या मैत्रिणीचे फोटो किंवा व्हिडीओ काढले आहेत का याचा अहवाल आल्यानंतर खुलासा होणार आहे.