About Us
सर्वांना नमस्कार. आपल्या आर्शिवादाची गरज
नमस्कार, मी अरुण बाबाजी सावरटकर गेली २७ वर्ष क्राईम पत्रकारीता करतोय. या कालावधीत मुंबई तरुण भारत, वृत्तमानस, पुढारी, नवाकाळ, प्रहार, जनशक्ती, प्रभात, नवशक्ती, आपल महानगर, पुण्यनगरी, मुक्तपीठ आदी दैनिकासह वेब पोर्टलसाठी काम केले. पत्रकार म्हणून काम करताना अनेकांशी चांगले संबंध निर्माण झाले, त्याचा रिपोटींगसाठी चांगला फायदा झाला. अनेक प्रसंगात चांगले-वाईट अनुभव आले, मात्र चांगली गोष्ट घेऊन वाईट अनुभवातून शिकत पुढे गेलो. क्राईम रिपोटींग करताना स्वतचे काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. आपण काहीतरी नवीन सुरु करायचं तर क्राईमच्या सर्वाधिक बातम्या देणारे वेब पोर्टल सुरु करायला काय हरकत आहे असा विचार आला. त्यात माझा हिंतचितक आणि मित्र आबा माळकर आणि वरिष्ठ सहकारी पत्रकार मित्र राजू परुळेकर यांची साथ मिळाली. अखेर वेब पोर्टल सुरु करण्याचा मुहूर्त ठरला. मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम नाव सुचले आणि याच नावाने वेब पोर्टल करण्याचा निर्णय घेतला. कुठलही चांगल्या कामाची सुरुवात गणरायाच्या नावाने होते, माझ्या आयुष्यात गणपती बाप्पाचे विशेष स्थान आहे. त्यामुळे वेब पोर्टलची सुरुवात १३ फेब्रुवारी २०२४ रोजी म्हणजेच माघी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सुरु करण्याचा निर्णय झाला. आज आपल्या सेवेत माझे क्राईमचे वेब पोर्टल सुरु करताना नक्कीच आनंद होत आहे. माझ्यावर प्रेम करणार्या, सतत माझ्या पाठिशी उभे राहणार्या माझ्या मित्रांनी, पोलीस अधिकारी, सहकारी आणि इतर ज्ञात-अज्ञात हिंतचितकांनी अशा प्रकारे मला साथ द्यावी. तुमच्या आर्शिवार्द, सहकार्याच्या जोरावर मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम नक्कीच यशाचे शिखर गाठेल अशी आशा बाळगतो.
मुख्य संपादक
अरुण बाबाजी सावरटकर
मी राजू हनुमंत परुळेकर गेल्या २९ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून या कालावधीत पोलीस टाइम्स, वृत्तमानस, तहलका न्यूज, पुण्यनगरी, सकाळ, डीएनए, युवा, हिंदू, लोकसत्ता ऑनलाईन, जय महाराष्ट्र, झी २४ तास, टिव्ही ९ चॅनेल आदी ठिकाणी काम केले आहे. या कालावधीत पोलीस खात्यातील अनेक आजी-माजी पोलीस अधिकार्यांशी चांगले संबंध प्रस्तापित केले. काहींशी कौटुंबिक संबंध निर्माण झाले. पत्रकार नव्हे तर त्यांचाच कुटुंबातील एक सदस्य तसेच मित्र म्हणून जवळ आलो. त्यांच्यासोबत गप्पा मारताना पोलीस दलातील समस्या, तपासदरम्यान येणारे अनुभव आणि बर्याच काही गोष्टींचा उलघडा होत गेला. काही नातेवाईक पोलीस खात्यात असल्याने त्यांचाही क्राईम रिपोटींग करताना नक्कीच मदत झाली. मराठी दैनिकांत काम करताना युवा, डिएनए आणि हिंदूसारख्या नामांकित दैनिकांत काम करण्याची संधी मिळाली. या ठिकाणी काम करताना अनेक विशेष व ब्रेकिंग न्यूज देऊन खर्या अर्थाने नाव झाले. फ्रिलान्स काम करताना स्वतचा वेब पार्टलबाबत माझा मित्र अरुण सावरटकरशी अनेकदा चर्चा झाली. त्याच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर अखेर स्वतचा क्राईमचे एक वेब पोर्टल सुरु करण्याचा निर्णय झाला. मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉमच्या माध्यमातून आज तुमच्या समोर कार्यकारी संपादक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. त्याचा नक्कीच अभिमान आहे. गेल्या २९ वर्षांत अनेकांची साथ लाभली. आर्शिवाद मिळाले. त्यामुळे यापुढे आपली साथ मिळावी अशी आशा बाळगतो. एक सामान्य क्राईम रिपोर्टर आणि आता एका क्राईम वेब पोर्टलचा कार्यकारी संपादक म्हणून काम करताना पोलीस दलातील जास्तीत जास्त चांगले वृत्त देण्याचा, त्यांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न असेल. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकार्यापासून पोलीस कर्मचार्याच्या कामाची योग्य ती दखल नक्की घेऊ. बस तुमच्या सहकार्यांची आणि पाठिंब्याची गरज आहे. ती आपण द्याल याबाबत दुमत नाही.
कार्यकारी संपादक
राजू हनुमंत परुळेकर