मोस्ट वॉण्टेड गॅगस्टर अनमोल बिष्णोईला अटक?

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये कारवाईचा दावा

0

राजू परुळेकर
१८ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – मोस्ट वॉण्टेड गॅगस्टर अनमोल बिष्णोईला अटक झाल्याचे वृत्त असून अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये ही कारवाई करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेला अनमोल बिष्णोई आहे का याचा भारतीय तपास यंत्रणेकडून शहानिशा सुरु आहे. सिनेअभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये झालेला गोळीबार आणि नंतर राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांच्या हत्येत अनमोल बिष्णोईचा सहभाग उघडकीस आला आहे. या दोन्ही गुन्ह्यांत त्याला वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यामुळे अनमोलवर अटकेची कारवाई झाली असल्यास ही मोठी कारवाई असल्याचे बोलले जाते. मात्र अनमोलच्या अटकेबाबत मुंबई पोलिसांकडून कुठलाही अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही.

अनमोल बिष्णोई हा मोस्ट वॉण्टेड गॅगस्टर असून तो विदेशात त्याची टोळी चालवितो. अनमोल हा पूर्वी गोल्डी ब्रारसाठी काम करत होता. नंतर त्याने स्वतची टोळीमार्फत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला होता. अनमोल आणि गोल्डी हे विदेशातून अनेक उद्योगपती, व्यावसायिक, गायक, राजकीय नेते आणि खेळांडूना धमकी देत होते. या दोघांनी स्वतच्या टोळीची प्रचंड दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. या टोळीच्या कारवाया पंजाब, हरियाणा, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, झारखंड, बिहार, मध्यप्रदेशात सुरु आहेत. मे २०२२ रोजी अनमोलचा भाऊ लॉरेन्स बिष्णोईच्या आदेशावरुन गायक सिद्धू मुसावाला यांची हत्या झाली होती. याच गुन्ह्यांत अनमोलचा मोठा भाऊ लॉरेन्सला पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून तो साबरमती जेलमध्ये बंद आहे. लॉरेन्सच्या आदेशावरुन गोल्डी आणि अनमोल सध्या विदेशात त्याच्या टोळीचे कारवाया करत होते. गेल्या काही वर्षांपासून अनमोल हा अमेरिकेत वास्तव्यास होता. चार दिवसांपूर्वी त्याला अमेरिकेच्या कॅनिफोर्निया, फ्रेस्नो येथून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान तो अनमोल बिष्णोई असल्याचे उघडकीस आले होते. तो भारतीय नागरिक असल्याने त्याची माहिती नंतर भारतीय तपास यंत्रणेला देण्यात आली होती. अटक केलेला अनमोल बिष्णोई आहे का, त्याला कोणत्या परिस्थितीत तिथे अटक करण्यात आली. त्याच्यावर कुठल्या गुन्ह्यांत कारवाई करण्यात आली आहे याचा माहिती काढण्याचे काम सुरु आहे.

गोल्डी ब्रारसह स्वतची विदेशातून टोळी चालविणारा अनमोलच्या इशार्‍यावर सिनेअभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घराजवळ त्याच्या सहकार्‍यांनी गोळीबार केला होता. त्यानंतर १२ ऑक्टोंबरला वांद्रे येथे त्याच्याच आदेशावरुन राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या दोन्ही गुन्ह्यांत अनमोलचा प्रत्यक्ष सहभाग उघडकीस आला होता. तो विदेशात राहून त्याची टोळी चालवत असल्याने त्याच्याविरुद्ध राष्ट्रीय तपास यंत्रणेने लुक आऊट नोटीस जारी केले होते. तसेच त्याच्या नावाचा मोस्ट वॉण्टेड गॅगस्टरच्या यादीत केले होते. त्याच्या अटकेने दहा लाखांचे ईनाम जाहीर कणयात आले होते. दोन वर्षांपूर्वी अनमोलने बोगस नावाने पासपोर्ट बनविले होते. याच पासपोर्टवर तो कॅनडा आणि नंतर अमेरिकेत पळून गेला होता. त्याच्याकडे काही बोगस प्रवासी कागदपत्रे असल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे बोलले जाते. अनमोलच्या अटकेने एफबीआयचे अधिकारी सीबीआय अधिकार्‍यांच्या संपर्कात असून त्यांनी त्यांच्याशी अनमोलसंदर्भात चर्चा केल्याचे बोलले जाते. त्याच्या गुन्ह्यांचे सर्व कागदपत्रे जमा करण्यास सांगण्यात आले आहे.

पंजाबी गायक मुसावाला याच्या हत्येनंतर अनमोल हा पळून गेला होता. त्याने स्वतचे बोगस पासपोर्ट बनविले होते. गेल्या वर्षी तो कॅलिफोर्नियाच्या पंजाबी लग्नात दिसला होता. या लग्नाचे काही फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात ाअले होते. ही माहिती नंतर तेथील पोलिसांना देऊन त्याच्यावर कारवाई करण्याची विनंती करण्यात आली होती. अनमोल हा भारतातील मोस्ट वॉण्टेड गॅगस्ट असून त्याच्याविरुद्ध विविध राज्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. नऊ खटल्यात त्याच्यावर वॉरंट जारी करण्यात आले आहे. गेल्या महिन्यांत अर्शदीप सिंग गिल ऊर्फ अर्श डल्ला याला कॅनडामध्ये अटक झाली होती. त्याच्या अटकेनंतर अनमोल बिष्णोई पकडला गेल्याने ही चालू वर्षांतील दुसरी मोठी कारवाई आहे. अनमोलवर कॅनडामध्ये हरदीप सिंग निज्जरची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्याचा ताबा कॅनडा पोलिसाकडून घेतला जाऊ शकता. कॅनडानंतर त्याचा ताबा मिळावा यासाठी भारत सरकारकडून दावा केला जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page