राज्यातील अठरा पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या

अकबर पठाण अभियान, दत्ता नलावडे-विशाल ठाकूर गुन्हे शाखेत

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – राज्य पोलीस दलातील अठरा पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आला आहे. त्यात अकबर पठाण यांची अभियान, दत्ता नलावडे आणि विशाल ठाकूर यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे.  

सोमवारी सायंकाळी उशिरा गृहविभागाकडून अठरा पोलीस उपायुक्ताच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. त्यात परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांची अभियान, परिमंडळ नऊचे पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांची परिमंडळ तीन, परिमंडळ दहाचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांची गुन्हे शाखा, परभणी पोलीस अधिक्षक रागसुधा आर यांची अंमलबजावणी गुन्हे शाखा, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त समाधान पवार यांची मध्य विभाग-वाहतूक विभाग, ठाण्याचे नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधिक्षक संदीप जाधव यांची ताडदेव दोन- सशस्त्र विभाग, पुणे ग्रामीण विभागाचे पोलीस अप्पर पोलीस अधिक्षक यांची पश्‍चिम उपनगर वाहतूक विभाग, अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य दत्तात्र बापू कांबळे यांची विशेष शाखा एक, पुणे ग्रामीण बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे यांची परिमंडळ अकरा, नागपूर लोहमार्ग विभागाच्या अप्पर पोलीस अधिक्षक वैशाली शिंदे यांची वरळी सशस्त्र पोलीस तीन, मुख्यालय दोनचया पोलीस उपायुक्क्त तेजस्वी सातपुते यांची परिमंडळ पाच, विशेष कृती दलाचे पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे यांची परिमंडळ दहा, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांची परिमंडळ नऊ, संरक्षण विभागाचे उपायुक्त महेश चिमटे यांची मुख्यालय एक, अभियान विभागाचे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांची गुन्हे शाखा एक, सुरक्षा विभागाचे उपायुक्त शाम घुगे यांची अंमली पदार्थ विरोधी पथक, सशस्त्र पोलीस ताडदेव विभागाचे उपायुक्त प्रज्ञा जेडगे यांची दक्षिण वाहतूक विभाग आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रकाश जाधव यांची संरक्षण विभागात बदली करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page