नेव्ही अधिकार्‍याकडून खंडणी वसुली करणार्‍या आरोपीस अटक

मनी लॉड्रिंगप्रकरणी डिजीटल अटकेची भीती दाखवून फसवणुक

0

अरुण सावरटकर
10 मार्च 2025
मुंबई, – विदेशात कोट्यवधी रुपये पाठवून देशद्रोहासह माजी मंत्री नवाब मलिक यांच्यासोबत मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत सहभागी असल्याचा आरोप करुन एका 54 वर्षांच्या नेव्ही अधिकार्‍याला डिजीटल अरेस्टची भीती दाखवून त्यांच्याकडून खंडणी वसुली केल्याप्रकरणी एका मुख्या आरोपीस राजस्थान येथून कफ परेड पोलिसांनी अटक केली. उग्राराम धमाराम गोदारा असे या 35 वर्षीय आरोपीचे नाव असून याच गुन्ह्यांत त्याल किल्ला कोटाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत यापूर्वी मुज्जमील लियाकतअली शेख आणि अनिल राजकुमार शर्मा या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. नंतर या दोघांनाही नोटीस देऊन सोडून देण्यात आले होते.

24 डिसेंबर 2024 रोजी ते कामावर असताना त्यांना दिल्लीतील ट्राय विभागातून एका अज्ञात व्यक्तीचा कॉल आला होता. या व्यक्तीने त्यांच्या आधारकार्डसह इतर दस्तावेजाचा देशद्रोहासह इतर बेकायदेशीर कृत्यात वापर झाला आहे. माजी मंत्री नवाब मलिक यांच्या मनी लॉड्रिंग प्रकरणात त्यांचा सहभाग उघडकीस आला आहे. त्यांनी विदेशात कोट्यवधी रुपये पाठविले आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्यांनी तपासात सहकार्य करावे असे सांगितले. त्यानंतर त्यांना पोलीस निरीक्षक गोपेशकुमार आणि पोलीस उपायुक्त राजवीर नावाच्या दोन तोतया पोलिसांनी व्हिडीओ कॉल केला होता.

या दोघांनी दिल्ली पोलिसांचा गणवेश घातला होता. त्यामुळे ते खरोखरच पोलीस असल्याचे त्यांना वाटले होते. त्यांनी त्यांचे नवाब मलिक यांच्याशी संबंध आहे. त्यांच्या मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत त्यांच्याविरुद्ध पुरावे असल्याची भीती दाखवून त्यांना डिजीटल अरेस्ट केल्याची बतावणी केली होती. त्यांचे मोबाईल दोन तासांत बंद होणार आहे. त्यामुळे त्यांना कोणाशी संपर्क साधता येणार नाही. चौकशी पूर्ण होईपर्यंत याबाबत त्यांना कोणालाही काहीही सांगता येणार नाही. त्यांनी तसा प्रयत्न केल्यास त्यांच्या राहत्या घरातून त्यांच्यवर अटकेची कारवाई होईल. त्यांच्यावर अटक वॉरंट जारी करण्यात आल्याची धमकी दिली होती. या घटनेने ते प्रचंड घाबरले होते. ते वॉरंट रद्द करण्यासाठी तसेच तपासात मदत करण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती.

चौकशी पूर्ण होतााच त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाईल असे सांगितले. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांना ऑनलाईन सुमारे सव्वासात लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. कामावर घरी आल्यानंतर त्यांनी हा प्रकार त्यांच्या पत्नीसह मित्राला सांगितला. यावेळी त्यांच्या मित्रांनी त्यांची अज्ञात सायबर ठगाकडून फसवणुक झाल्याचे सांगून त्यांना पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार कफ परे पोलिसांना सांगून ट्रायसह दिल्लीतील संबंधित तोतया पोलिसाविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी फसवणुकीसह खंडणी आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरु केला होता.

तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी राजस्थानच्या बिकानेर येथून मुज्जमील शेख आणि अनिल शर्मा या दोघांना ताब्यात घेतले होते. तपासात या दोघांनीच खंडणीची रक्कम उग्राराम गोदारासह त्याचा मित्र प्रमोद गोदरा ऊर्फ बिष्णोई याला दिल्याचे उघडकीस आले आहे. या कटात ते दोघेही मुख्य सूत्रधार होते. त्यामुळे या दोघांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या तीन महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या उग्राराम गोदारा याला बिकानेर येथून पोलिसंनी अटक केली.

अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. उग्रारामची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु असून या टोळीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे बोलले जाते. या गुन्ह्यांची माहिती काढण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page