राजू परुळेकर
जनतेसाठी काम करणारी व्यक्ती जनतेत प्रचंड प्रसिद्ध असते. शिवा शेट्टी नावाची व्यक्तीही अशीच प्रसिद्ध आहे. बोरिवली पश्चिम येथील नगरसेवक शिवा शेट्टी यांचा करिष्मा का इतका मोठा आहे, याचे कोडे बोरिवली बाहेर राहणाऱ्या व्यक्तींना कायम पडलेले असते. एकदा लोअर परळमध्ये रात्रीच्या वेळी चायनिजच्या गाडीवर खाण्यासाठी थांबलो होतो. तर गाडीवर काम करणाऱ्या एका मुलाने शिवा शेट्टी यांचा फोटो असलेले टी-शर्ट घातले होते. त्याखाली नगरसेवक शिवा शेट्टी असे लिहिले होते. मी त्या मुलाला विचारले अरे हे शिवा शेट्टी कोण, तर तो म्हणाला, बोरिवली के नगरसेवक है, भगवान जैसे..मै उधर काम करता था, इसलिए मुझे मालूम है… त्याने दिलेल्या उत्तराने माझी शिवा शेट्टी यांच्याबद्दलची उत्सुकता ताणली गेली. बोरिवली पश्चिम एमआयजी काॅलनीत माझा एक मित्र राहतो. कट्टर भाजपवादी, मोदी भक्त, पण नगरसेवकपदासाठी भले भाजपने उमेदवार दिला तरी आपण शिवा शेट्टींनाच मत देणार, असे तो बेंबीच्या देठापासून ओरडून म्हणला. तर असे हे शिवा शेट्टी जनमानसात इतके प्रसिद्ध का?
गुढीपाडव्याच्या निमित्त बोरीवली वजिरा नाका येथे अनेक शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते, तसेच या दरम्यान राम मंदिर रोड, बागवे निवास वजिरा नाका येथे रोड चे काम चालू होते, या दरम्यान कॉन्ट्रॅक्टर च्या चुकी मुळे,रोड सी सी काम चालू असताना जेसीबी मुळे गॅस पाईप लाईन व बाजूला असलेली लाईट केबल ला धक्का लागल्या मुळें शॉर्ट सर्किट होऊन मोठ्या प्रमाणात आग लागली, शिवा शेट्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस बांधवान सोबत तेथे माती टाकून आग वीजवण्याचा प्रयत्न केला,व थोडा हि विलंब न करता माझे मित्र श्री सुनील पुजारी यांना सांगून फायर स्टेशन येथे संपर्क साधला, आग इतकी मोठी होती कि फायर ब्रिगेड ला देखील आग आटोक्यात आणे कठीण होते, या दरम्यान गॅस कर्मचारी यांना तेथे बोलावून गॅस लाईन चा कॉक बंद केला व तेव्हा कुठे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.दहावी – बारावीच्या वार्षिक परीक्षा चालू आहेत तसेच गोराई, गोराई गाव, बोरीवली परिसरातील रिक्षा चालक जवळचे भाडे नाकारत असल्यामुळे वेळेत रिक्षा न भेटल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचण्यास उशीर होतो. तसेच यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते म्हणून शिवा शेट्टी यांनी गोराई परिसरातील रिक्षा चालक संघटना व रिक्षा स्टँड येथे भेट देऊन सर्व रिक्षा चालकांशी चर्चा केली तसेच जवळचे भाडे नाकारू नका तसेच विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यासाठी विनंती केली व या आशयाचे पत्र सुद्धा दिले. त्यामुळे कोणीही रिक्षा चालकाने भाडे नाकारले नाही.
गेल्या कित्येक दिवसांपासून गोराई गावात पाण्याच्या समस्यांमुळे आपण अप्पर कोळीवाडा, लोअर कोळीवाडा, जुईपाडा, बस स्टॉप पर्यंत पाण्याला प्रेशर नसल्यामुळे पाणी पोचत नव्हते. तसेच इतर ही कारण असल्याने व पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात 27 टक्के पाणी शिल्लक असल्यामुळे तेथील नागरिकांना पाणी टंचाई चा सामना करावा लागत होता. शिवा शेट्टी यांनी दोन महिन्यांपासून वारंवार महानगर पालिकेच्या अधिकाऱ्याची भेट घेऊन सुद्धा काहीच उपाय होत नव्हते.या घटनेला मीडियात प्रसिद्धी देण्यात आली. गावकऱ्यांनी पाणी नाही म्हणून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रशासन जागा झाला व त्वरित महानगरपालिकेचे अधिकारी, हायड्रोलिक इंजिनिअर यांनी तेथे भेट दिली. व लगेचच पाण्याच्या प्रेशर कसा वाढवता येईल हे पूर्ण मानोरी आणि सर्व गावामध्ये पाहणी करून ते दुरुस्त करून घेतले. व काल सर्व गावामध्ये पाणी सुद्धा चांगल्या प्रमाणात आले.
शिवा शेट्टी इतके प्रसिद्ध का, ही त्याची तीन उदाहरणे. खरं तरी अशी शेकड्याने उदाहरणे मिळतील. एक व्यक्ती पक्ष नसतानाही वारंवार निवडून येते ते नेमके कसे हे जाणून घ्यायचे असेल तर शिवा शेट्टी यांच्याकडे बघायला हवे. सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर असलेले शिवा शेट्टी जनतेसाठी २४ तास उपलब्ध असतात. म्हणूनच ते इतके प्रसिद्ध आहेत. आज बोरिवली पश्चिम येथे प्रत्येकाच्या तोंडी शिवा शेट्टी यांचेच नाव आहे. ते केवळ आणि केवळ त्यांच्या कामामुळेच.