वामन शंकर मराठे ज्वेलर्स लुटप्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश
सुरत शहरातून पाचजणांना २९ लाखांच्या मुद्देमालासह अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ डिसेंबर २०२४
ठाणे, – ठाण्यातील नौपाड्यातील प्रसिद्ध वामन शंकर मराठे ज्वेलर्स दुकाना झालेल्या लुटीचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाला यश आले आहे. याच गुन्ह्यांत पाच रेकॉर्डवरील आरोपींना पोलिसांनी अटक केली असून ते सर्वजण आंतरराज्य टोळीचे सदस्य आहेत. लिलाराम ऊर्फ लिलेश मालाराम मेघवाल, चुन्नीलाल ऊर्फ सुमत शंकरलाल प्रजापती, जैसाराम ऊर्फ जेडी देवाराम कलबी, दोनाराम ऊर्फ दिलीप मााराम पराडिया आणि नागजीराम प्रतापजी मेघवाल अशी या पाचजणांची नावे आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी चोरीचा सुमारे २९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटकेनंतर पाचही आरोपींना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना गुरुवार २६ डिसेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींविरुद्ध गुजरात आणि राजस्थानात गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघडकीस आले.
यातील तक्रारदार ज्वेलर्स व्यापारी असून त्यांच्या मालकीचे नौपाडा परिसरात वामन शंकर मराठे ज्वेलर्स नावाचे एक सोन्या-चांदीचे दुकान आहे. १७ डिसेंबरला या दुकानाचे मुख्य प्रवेशद्वाराचे कडीकोयंडा व शटर तोडून काही अज्ञात व्यक्तींनी प्रवेश केला होता. त्यानंतर दुकानातील २८ लाख ७७ हजार ४९० रुपयांचे विविध सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले होते. दुसर दिवशी हा प्रकार उघडकीस येताच तक्रारदार व्यापार्याने नौपाडा पोलिसांना ही माहिती सांगितली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेला संमातर तपास करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर स्थानिक पोलिसांसह खंडणीविरोधी पथकाने आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही शोधमोहीम सुरु असताना या पथकाने गुजरातच्या सुरत शहरातून पाच संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यात लिलाराम, चुन्नीलाल, जैसाराम, दोनाराम आणि नागजीराम यांचा समावेश होता. या सर्वांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी वामन मराठे ज्वेलर्स दुकानात लुटमार केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांी ४८३ ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने, साडेपाच किलो वजनाचे चांदीचे नाणी, भांडी, दागिने, इमिटेशन ज्वेलरी, मोबाईल असा २९ लाख १५ हजार ३४० रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहेत.
तपासात ही रॉबरी करणारी आंतरराज्य टोळी असून या टोळीविरुद्ध गुजरातच्या कपोदर आणि राजस्थानच्या जयवंतपुरा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. चुन्नीराम, चुन्नीराम, दोनाराम आणि नागजीराम हे चारजण मूळचे राजस्थानच्या जालोर, संग्रामपुराचे रहिवाशी आहेत. ते चौघेही सध्या गुजरातच्या शहरात आईस्क्रिम पार्लर, इलेक्ट्रीशियन, मिस्त्रीकाम करतात तर नागजीरामचे तिथेच स्वतचे एक दुकान आहे. जैसाराम हा चेंबूरच्या वाशीनाका परिसरात राहत असून इलेक्ट्रिशन म्हणून काम करतो. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर पाचही आरोपींना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक शेखर बागडे, पोलीस निरीक्षक नरेंद्र पवार, संजय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सुनिल तारमळे, श्रीकृष्ण गोरे, भूषण कापडणीस, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड, सुभाष तावडे, दिपक पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय बाबर, संदीप भोसले, पोलीस हवालदार दिपक गडगे, राजाराम पाटील, आशिष ठाकूर, दादासाहेब पाटील, संजय राठोड, सचिन शिंपी, योगीराज कानडे, अभिजीत गायकवाड, महिला पोलीस हवालदार शितल पावसकर, पोलीस नाईक रविंद्र हासे, सुमीत मधाळे, पोलीस शिपाई तानाजी पाटील, संतोष वायकर, अरविंद शेजवळ, विनोद ढाकणे, योगेश शिरसागर, रोहन म्हात्रे, दत्तात्रय घोडके, मयुर शिरसाठ, चालक पोलीस नाईक भगवान हिवरे यांनी केली.