विविध गुन्ह्यांत 38 वॉण्टेड आरोपींना अटक

झोन चारच्या स्थानिक पोलिसांची विशेष कामगिरी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 जून 2025
मुंबई, – विविध गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या 38 आरोपींना झोन चारच्या स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. त्यात प्रॉपटी, बॉडी आणि इतर गुन्ह्यांतील आरोपींचा समावेश आहे. यातील काही आरोपी गेल्या कित्येक वर्षांपासून पोलिसांना सतत गुंगारा देत होते, मात्र या विशेष मोहीमेमुळे त्यांना पुन्हा अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या दहा दिवसांत स्थानिक पोलिसांनी ही विशेष कामगिरी केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

झोन चारच्या अंतर्गत येणार्‍या पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यांत काही आरोपी वॉण्टेड असल्याचे उघडकीस आले होते. या वॉण्टेड आणि पाहिजे आरोपींची वरिष्ठांकडून माहिती घेण्यात आली होती. या माहितीनंतर काही गुन्ह्यांतील आरोपी बर्‍याच महिन्यांपासून फरार असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्याची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेत घेण्यात आली होती. या आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम राबविण्याचे स्थानिक पोलिसांना देण्यात आले होते.

या आदेशानंतर अशा आरोपींच्या अटकेसाठी संबंधित पोलिसांनी 11 जून ते 20 जून या कालावधीत विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एका विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाने वेगवेगळ्या गुन्ह्यांत पाहिजे आणि फरार असलेल्या 38 आरोपींना अटक केली. त्यात 34 बॉडी, 13 प्रॉपटी तर 12 इतर गुन्ह्यांतील आरोपींचा समावेश आहे. यातील काही आरोपी 1989, 1993 आणि 2007 पासून वॉण्टेड असल्याचे उघडकीस आले आहे.

गुन्हा घडल्यानंतर तसेच जामिन मिळाल्यानंतर ते पळून गेले होते. खटल्याच्या सुनावणीसाठी सतत गैरहजर राहत होते. स्वत अस्तिस्त लपवून नाव बदलून ते वेगवेगळ्या परिसरात राहत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दहा दिवसांत 38 पाहिजे आणि फरार आरोपींना अटक करणार्‍या विशेष पथकाचे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी कौतुक केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page