स्नॅपचॅटवर ब्लॉक केले म्हणून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
मैत्री ठेवली नाहीतर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
16 मे 2025
मुंबई, – विश्वास संपादन करुन अश्लील फोटो घेऊन एका अकरा वर्षांच्या मुलीचा विनयभंग करुन तिला मैत्री ठेवली नाहीतर ब्लॅकमेल करत तिचे अश्लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार कांजूरमार्ग परिसरात उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे ही धमकी एका तरुणीच्या नावाने देण्यात आली असली तरी ती तरुणी आहे की तरुण याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध कांजूरमार्ग पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
38 वर्षांची तक्रारदार महिला कांजूरमार्ग परिसरात राहत असून ती एका खाजगी कंपनीत कामाला आहे. तिला अकरा वर्षांची मुलगी असून ती सध्या शिक्षण घेते. एप्रिल महिन्यांत तिची स्नॅपचॅटवर सान्वी राव नाव सांगणार्या तरुणीशी मैत्री झाली होती. तिचा विश्वास संपादन करुन तिने तिचे काही अश्लील फोटो घेतले होते. ते फोटो तिने स्वतच्या मोबाईलमध्ये सेव्ह केले होते. काही दिवसांनी तिने तिला अनफे्रड करुन ब्लॉक केले होते. त्याचा राग आल्याने तिने तिला व्हॉटअपवर काही धमकीवजा इशारे देणारे मॅसेज पाठविले होते. तिच्याशी मैत्री ठेवली नाहीतर तिचे सर्व अश्लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. हा संपूर्ण प्रकार 10 एप्रिल ते 15 मे 2025 या कालावधीत घडला होता.
या प्रकाराने ही मुलगी प्रचंड घाबरली आणि तिने घडलेला प्रकार तिच्या तक्रारदार आईला सांगितला होता. या माहितीनंतर तिने कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात सान्वी राव या तरुणीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु आहे. सान्वी राव ही तरुणी आहे की तरुण आहे याचा तपास सुरु आहे. त्याने तरुणीच्या नावाने अकाऊंट ओपन करुन तिच्याशी मैत्री करुन तिचे अश्लील फोटो घेतले होते का, त्याने अशाच प्रकारे इतर काही तरुणीशी संपर्क साधून त्यांचेही अश्लील फोटो घेतले आहे का याचा पोलीस तपास असल्याचे पोलिसांनी सांगितले.