व्हिसासाठी घेतलेल्या 79 लाखांचा अपहार करुन फसवणुक
मुख्य आरोपीस मदत करणार्या महिला कर्मचार्याला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
2 जुलै 2025
मुंबई, – व्हिसासाठी घेतलेल्या सुमारे 79 लाखांचा अपहार करुन बंगलोरच्या एका महिला व्यावसायिकासह दोघांची सुमारे 79 लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी अल्पाबेन दिनेशकुमार नंदानी ऊर्फ ठक्कर या महिलेस मालाड पोलिसांनी अटक केली. या कटातील मुख्य आरोपी प अॅसिल ट्रॅव्हेल्स कंपनीचा मालक दिव्येश पटेलला मदत केल्याचा तिच्यावर आरोप असून फसवणुकीची काही रक्कम तिच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. गुन्हा दाखल होताच दिव्येश पटेलसह अल्पाबेन ठक्कर हे दोघेही पळून गेले होते, अखेर एक वर्षांनी अल्पाबेनला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून याच गुन्ह्यांत ती सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या वृत्ताला पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांनी दुजोरा दिला आहे.
सुनायना जगननादम पेरुरी ही महिला मूळची बंगलोरची रहिवाशी आहे. तिचा राईट चॉईस कॅरिअर अॅडव्हायजर ओपीसी लिमिटेड नावाची व्हिसा कनस्लंटिंगचा व्यवसाय आहे. ती युरोप, कॅनडा देशात जाणार्या लोकांना व्हिसा देण्याचे काम करते. त्यासाठी तिला संबंधित ग्राहकांकडून लिगल फी म्हणून मानधन दिले जाते. नोव्हेबर 2019 तिला एका खाजगी वेबसाईटवर मालाडच्या लिंक रोड, काचपाडा, जयवंती अलाईड बिझनेस सेेंटरची एक जाहिरात दिसली होती. या कंपनीचा दिव्येश पटेल हा मालक असून तोदेखील व्हिसाचे काम करत होता. त्यामुळे तिने त्याला फोन करुन त्याच्याकडे व्हिसाच्या कामाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याने एका व्हिसामागे तो तीन लाख रुपये घेत असल्याचे सांगितले. त्यामुळे तिने तिच्याकडे येणार्या सर्व व्हिसाचे काम दिव्येशकडे देण्याचा निर्णय घेतला होता.
मुंबईत आल्यानंतर तिने दिव्येशची भेट घेतली होती. त्याच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांच्यात व्हिसा कामाबाबत एक करार झाला होता. 2 मे 2020 ते 22 सप्टेंबर 2021 या कालावधीत तिच्या कंपनीकडून 62 लोकांचे व्हिसा बनवून देण्याचे काम आले होते. ते काम तिने दिव्येशला दिले होते. त्यासाठी तिने त्याच्या बँक खात्यात 78 हजार 10 हजार तर त्याच्या सांगण्यावरुन त्याच्या कंपनीतील कर्मचारी योगेश पटेल याच्या बँक खात्यात 14 लाख रुपये असे 92 लाख 10 हजार ट्रान्स्फर केले होते. ऑक्टोंबर-डिसेंबर 2021 या कालावधीत त्याने तीन लोकांचे कॅनडा देशाचे व्हिसा मंजुर झाल्याचे सांगितले. व्हिसाचे कागदपत्रे आल्यानंतर तिला तो व्हिसा वर्क नसून व्हिझीट व्हिसा असल्याचे दिसून आले. मूळात व्हिझीट व्हिसा घेताना तिची परवानगी घेणे आवश्यक होते, मात्र तशी कुठलीही मंजुरी न घेता त्याने व्हिझीट व्हिसा मिळविला होता. त्यामुळे तिने दिव्येशकडे विचारणा केली होती.
मात्र त्याने तिला टाळण्याचा प्रयत्न केला. त्याने दिलेल्या व्हिसावर विदेशात गेलेल्या प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले होते, त्याच व्हिसा रद्द करुन त्याला पुन्हा भारतात पाठविण्यात आले होते. दिव्येशने बोगस कागदपत्रे सादर करुन व्हिसा मिळविल्याने या प्रवाशाला तीन वर्षांसाठी कॅनडामध्ये बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे त्याने तिच्याविरुद्ध तेथील लोकल कोर्टात एक केस फाईल केली होती. दुसरीकडे दिव्येशने उर्वरित लोकांचे व्हिसाचे काम पूर्ण केले नव्हते. त्यामुळे तिने त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी दिव्येशने तिला 19 लाख 34 हजार रुपये परत केले होते. मात्र उर्वरित रक्कम वारंवार मागणी करुनही परत केली नाही. त्याने तिला आठ पोस्ट डेटेड चेक दिले होते, मात्र ते सर्व चेक बँकेत न वटत परत आले होते.
याच दरम्यान तिला अन्य एका व्यक्तीला तिच्या मुलीसाठी स्टुंडट व्हिसा देतो असे सांगून त्याची साडेसहा लाखांची फसवणुक केली होती. अशा प्रकारे त्याने व्हिसाच्या कामासाठी घेतलेल्या सुमारे 79 लाखांचा अपहार करुन तिची फसवणुक केली होती. त्यामुळे तिच्यासह संबंधित व्यक्तीने दिव्येशविरुद्ध मालाड पोलिसांत तक्रार केली होती. या गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांच्याकडे होता. तपासात दिव्येशला अल्पाबेन हिने मदत केल्याचे उघडकीस आले होते. फसवणुकीची काही रक्कम तिच्या बँक खात्यात जमा झाली होती. त्यामुळे तिला सहआरोपी करुन तिच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही शोधमोहीम सुुरु असताना पोलीस निरीक्षक मनोज पाटील व त्यांच्या पथकाने गेल्या एक वर्षांपासून फरार असलेल्या अल्पाबेन ठक्कार हिला चौकशीत ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत तिचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर तिला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीनंतर तिला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.