39 लाखांच्या चोरीप्रकरणी नोकराविरुद्ध गुन्हा दाखल

हिरेजडीत सोन्याच्या दागिन्यांसह रोलेक्सचा घड्याळाची चोरी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
4 जुलै 2025
मुंबई, – सुमारे 39 लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी मोहनकुमार महेंद्र साहा या नोकराविरुद्ध खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोहनकुमार हा बिहारचा रहिवाशी असून चोरीनंतर तो बिहारला पळून गेला होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

62 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार अशोक श्रीकिशन मुंद्रा हे रियल इस्टेट व्यावसायिक असून त्यांच्या कुटुंबियांसोबत खारच्या ऑर्नट अपार्टमेंटमध्ये राहतात. मुंबईसह राजस्थानच्या जयपूर, हाँगकाँग देशात त्यांच्या मालकीचे फ्लॅटसह इतर प्रॉपटी आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून त्यांच्याकडे मोहनकुमार हा कुक म्हणून काम करतो. मोहनकुमार हा मूळचा बिहारच्या समस्तीपूरचा रहिवाशी असून अनेकदा तो त्यांच्यासोबत मुंबईसह जयपूर, हाँगकाँगला जातो.

10 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2023 या कालावधीत तो त्यांच्या खार येथील कामाला होता. त्यानंतर तो त्यांच्यासोबत हाँगकाँगला गेला होता. 27 एप्रिल 2025 रोजी मोहनकुमार हा हाँगकाँगहून त्याच्या बिहार येथील गावी गेला होता. यावेळी त्याच्या हातात त्यांच्या रोलेक्स कंपनीचा घड्याळ अशोक मुंद्रा यांचा मुलगा रिशी याने पाहिला होता. यावेळी रिशीने त्याला विचारणा केल्यानंतर त्याने टोलवाटोलवी करुन काहीही न सांगता तेथून निघून गेला होता.

हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याने ही माहिती त्याचे वडिल अशोक मुंद्रा यांना सांगितली होती. त्यानंतर त्यांनी त्यांच्या खार येथील कपाटातील दागिन्यांसह इतर वस्तूची पाहणी केली होती. त्यात त्यांना 25 लाखांचा एक रोलेक्स घड्याळ, दहा लाखांची एक डायमंड रिंग आणि चार लाखांची एक सोन्याची चैन असा 39 लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले. हा प्रकार उघडकीस त्यांनी मोहनकुमारला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा संपर्क होऊ शकला नाही.

ऑगस्ट ते सप्टेंबर 2023 या कालावधीत त्याने ही चोरी केली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी खार पोलिसांत मोहनकुमारविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page