मुंबईसह राज्य पोलीस दलातील आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या

बदल्यांमध्ये मुंबईतील तेरा पोलीस उपायुक्तांचा समावेश

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 जुलै 2025
मुंबई, – मुंबईसह राज्य पोलीस दलातील आयपीएस अधिकार्‍यांच्या मंगळवारी बदल्याचे आदेश जारी करण्यात आले. त्यात मुंबई शहरातील तेरा पोलीस उपायुक्तांच्या समावेश असून मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी संबंधित अधिकार्‍यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहे. गेल्या काही दिवसांपासून काही पोलीस उपायुक्तांच्या बदलीचे संकेत देण्यात आले होते.

ठरल्याप्रमाणे मंगळवारी पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी मुंबईतील दहा पोलीस उपायुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्या सुनिल लोखंडे यांची मरोळ सशस्त्र पोलीस दल, ठाण्याचे पोलीस उपायुक्त महेंद्र पंडीत यांची परिमंडळ पाच, पुण्याच्या राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त निलेश अष्टेकर यांची कालिना सशस्त्र पोलीस दल, मुंबई राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त अजीत बोराडे यांची पश्चिम विभागाच्या वाहतूक विभाग, परिमंडळ पाचचे गणेश गावडे यांची संरक्षण, ताडदेव सशस्त्र विभागाचे उपायुक्त संदीप जाधव यांची परिमंडळ अकरा, परिमंडळ अकराचे उपायुक्त आनंद भोईटे यांची नायगाव सशस्त्र पोलीस दल, पश्चिम वाहतूक विभागाचे उपायुक्त मितेश घट्टे यांची ताडदेवच्या सशस्त्र पोलीस दल आणि जलद प्रतिसाद पथकाचे उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांची मंत्रालय सुरक्षा विभाग, मुख्यालय एकच्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळच्या पोलीस अधिक्षक, मुख्यालय-मध्य वाहतूक विभागाचे उपायुक्त समाधान पवार यांची अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आयोगच्या पोलीस अधिक्षक तर नायगाव सशस्त्र विभागाचे विनायक ढाकणे यांची मुंबईच्या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

इतर बदल्यांमध्ये आठ आयपीएस अधिकार्‍यांच्या मंगळवारी गृहविभागाने बदलीचे आदेश जारी केले आहे. या पोलीस अधिकार्‍यांमध्ये बीडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सहाय्यक पोलीस अधिक्षक कमलेश मीना यांची गडचिरोलीच्या राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तेरा, चंद्रपूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सहाय्यक पोलीस अधिक्षक नवमी दशरथ साटम यांची सिंधुदुर्गच्या अप्पर पोलीस अधिक्षक, लातूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सहाय्यक पोलीस अधिक्षक अनमोल मित्तल यांची ठाणे ग्रामीण अप्पर पोलीस अधिक्षक, लातूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सहाय्यक पोलीस अधिक्षक बदेली चंद्रकांत रेड्डी यांची अकोला अप्पर पोलीस अधिक्षक, नाशिकचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सहाय्यक पोलीस अधिक्षक सुरज भाऊसाहेब गुंजाळ यांची परभणी अप्पर पोलीस अधिक्षक, नागपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सहाय्यक पोलीस अधिक्षक अनिल रामदास म्हस्के यांची नाशिक शहर पोलीस उपायुक्त, यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सहाय्यक पोलीस अधिक्षक चिलुमुला रजनीकांत यांची दौंडच्या राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सात, नांदेडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सहाय्यक पोलीस अधिक्षक किरीथिका सी. एम यांची अमरावती पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page