आमदार निवासमधील कॅण्टीन कर्मचार्‍याला मारहाणप्रकरण

आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 जुलै 2025
मुंबई, – आमदार निवासमधील कॅण्टीन कर्मचार्‍याला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध अखेर मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. सोशल मिडीयावर मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. संजय गायकवाड हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार असून ते बुलढाण्यातून दोन वेळा आमदार निवडुन आले होते.

गेल्या आठवड्यात संजय गायकवाड हे आमदार निवासमधील कॅण्टीनमध्ये गेले होते. त्यांना देण्यात आललेे डाळ आणि तांदूळ शिळे आणि दुर्गंधीयुक्त होते. त्यामुळे त्यांनी कॅण्टीनमध्ये जाऊन संबंधित कर्मचार्‍याला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली होती. या मारहाणीचा सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल झाला होता. राज्य अधिवेशन सुरु असल्याने विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित करुन सत्ताधार्‍यांना वेठीस धरले होते. या मारहाणीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर मरिनड्राईव्ह पोलिसांनी संबंधित कॅण्टीन कर्मचार्‍याला तक्रार करण्यासाठी बोलाविण्यात आले होते.

मात्र हा कर्मचारी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेला नाही. त्यामुळे पोलिसांनी सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या आधारे स्वतहून आमदार संजय गायकवाड यांच्यासह त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांविरुद्ध 115 (2), 3 (5) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली होती. एकीकडे या मारहाणीच्या व्हिडीओमुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट असताना संजय गायकवाड यांनी घडलेल्या प्रकाराची माफी मागण्यास नकार दिला होता. गरज पडल्यास ते पुन्हा असेच कृत्य करतील असे विधान केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page