शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून विनयभंग
40 वर्षीय शिक्षकाविरुद्ध विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 जुलै 2025
मुंबई, – कांदिवलीतील महानगरपालिकेच्या शाळेत बारा वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा तिच्याच शिक्षकाने विनयभंग करुन लाकडी पट्टीने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या मुलीच्या तक्रारीवरुन समतानगर पोलिसांनी 40 वर्षांच्या शिक्षकाविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून अद्याप शिक्षकावर अटकेची कारवाई झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
बळीत मुलगी बारा वर्षांची असून ती तिच्या पालकांसोबत कांदिवली परिसरात राहते. याच परिसरातील एका महानगरपालिकेच्या शाळेत ती सहावीत शिकते. आरोपी याच शाळेत शिक्षक म्हणून कामाला आहे. शनिवार 5 जुलैला ही मुलगी नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. सकाळी साडेदहा वाजता ती तिच्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत होती. यावेळी तिथे आरोपी शिक्षक आला आणित्याने तिच्याशी जवळीक साधून तिच्याशी अश्लील वर्तन केले होते. तिच्या छातीला नकोसा स्पर्श, पार्श्वभागावर हाताने फटका करुन तिचा विनयभंग केला होता. काही वेळानंतर त्याचा वर्गात क्लास होता. शिकवणीदरम्यान या मुलीने त्याला प्रश्न विचारले असता त्याने तिच्या हातावर लाकडी पट्टीने मारहाण केली होती. तसेच तिच्या गालावर जोरात चापटा मारल्या.
सुरुवातीला हा प्रकार तिने कोणालाही सांगितला. मात्र नंतर तिच्या पालकांना ही माहिती सांगितला. या माहितीनंतर त्यांनी तिला समतानगर पोलीस ठाण्यात आणले. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी शिक्षकाविरुद्ध तक्रार केली होती. बळीत मुलीची पोलिसांनी जबानी नोंदवून तिच्या तक्रारीवरुन आरोपी शिक्षकाविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत शिक्षकाला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्याच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.