मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 जुलै 2025
मुंबई, – जहाजावर शेफ म्हणून नोकरीच्या आमिषाने एका तरुणाची फसवणुक करु पळून गेलेल्या मुख्य आरोपीस वनराई पोलिसांनी अटक केली. अमीत शरद मोडक असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यातील 21 वर्षांचा तरुण गोरेगाव परिसरात राहत असून एका नामांकित हॉटेलमध्ये शेफ म्हणून कामाला आहे. तीन वर्षांपूर्वी त्याने नाशिक येथून फुड प्रोडेक्शन जनरलचा एक वर्षांचा कोर्स केला होता. त्यानंतर त्याला विदेशात शेफ म्हणून काम करण्याची इच्छा होती. त्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु होते. त्यासाठी त्याने सीफेअरर आयड कार्ड आणि सीडीसी कार्ड मिळवलिे होते. जेणेकरुन त्याला जहाजावर शेफ म्हणून काम करण्यास काहीच अडचण येणार नव्हती.
याच दरम्यान त्याची अमीत मोडकशी ओळख झाली होती. त्याने तो एका खाजगी कंपनीत कामाला असल्याने सांगून त्याला जहाजावर शेफ म्हणून नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. याच नोकरीसाठी त्याने त्याच्याकडून विविध प्रोसेस म्हणून पावणेदोन लाख रुपये घेतले होते. मात्र त्याने त्याला नोकरी मिळवून दिली होती. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याची त्याने त्याच्या कंपनीत जाऊन चौकशी केली होती. त्यात तो संबंधित कंपनीत कामाला नसल्याचे उघडकीस आले.
त्याने अशाच प्रकारे इतर काही तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून गंडा घातला होता. हा प्रकार उघडकीस येताच त्याने अमीतविरुद्ध वनराई पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी फसवणकीचा गुन्हा दाखल होताच त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना पळून गेलेल्या अमीतला पाच महिन्यानंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.