मानसिक व शारीरिक शोषणाला कंटाळून पत्नीची आत्महत्या

पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल तर पतीला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 जुलै 2025
मुंबई, – कौटुंबिक वाद काढून सतत होणार्‍या मानसिक व शारीरिक शोषणाला छाया सचिन बच्चे या 25 वर्षांच्या विवाहीत महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. छायाचा मानसिक व शारीरिक शोषण करुन तिला आत्महत्या केल्याप्रकरणी तिचा पती सचिन धर्मेश बच्चे आणि सासू सविता धर्मेश बच्चे या दोघांविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत नंतर सचिन बच्चे याला पोलिसांनी अटक केली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. सविताला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून तिच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही घटना बुधवारी 16 जुलैला रात्री उशिरा अंधेरीतील वर्सोवा गाव, शिवगल्ली, भांजी हाऊसच्या रुम क्रमांक दोनमध्ये घडली. शंकुतला शांताराम हगवणे ही महिला मालाड येथे राहते. मृत छाया ही तिची मोठी मुलगी असून तिचे जुलै 2022 रोजी सचिन बच्चेसोबत अंधेरीतील वर्सोवा परिसरात दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने विवाह झाला होता. लग्नानंतर ती तिच्या वर्सोवा येथील सासरी राहत होती. लग्नाच्या अवघ्या तीन महिन्यांत तिचा तिचापती सचिन आणि सासू सविता ही क्षुल्लक कौटुंबिक वादातून तिचा मानसिक व शारीरिक शोषण करु लागली होती. सतत तिला शिवीगाळ करुन मारहाण केली जात होती. या छळाला कंटाळून तिने स्वतच्या उजव्या हाताच्या मनगटावर कटरने कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांनी तिला औषधोपचारानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल केले नाही.

या घटनेनंतर त्यांनी तिला घरातून बाहेर काढले होते. हा प्रकार समजताच शंकुतला हगवणे हिने त्यांच्या घरी जाऊन तिच्या पतीसह छायाची समजूत काढून तिला पुन्हा सासरी पाठवून दिले होते.डिसेंबर 2023 सचिनने भाड्याने रुम घेतले होते. तिथे तो छाया आणि त्याची आई सविता यांच्यासोबत रहत होता. नवीन घरात तरी वाद होणार नाही असे तिला वाटत होते. मात्र तिथेही तिचा त्यांच्याकडून मानसिक शोषण सुरु केले होते. तिने नोकरी करुन घरी पैसे आणावेत म्हणून तिला मारहाण केली जात होती. त्यामुळे तिने मरोळ येथील एका खाजगी कंपनीत काम सुरु केले होते. तिचा सर्व पगार ती तिच्या पतीला देत होती. तिच्याच पगारावर त्यांच्या घरातील सर्व खर्च चालत होता. तरीही तिचा पती सचिन आणि सासू सविता यांच्याकडून क्षुल्लक कौटुंबिक कारणावरुन छळ सुरु होता.

या छळाला ती कंटाळून गेली होती. 16 जुलैला रात्री साडेदहाा वाजता तिला सचिनचा कॉल आला होता. त्याने छायाने त्याच्यासह त्याच्या आईशी वाद घालून घराचा दरवाजा आतून बंद केला होता. त्यामुळे तुम्ही येथे येऊन तिला घेऊन जा असे सांगितले. त्यामुळे शंकुतला ही वर्सोवा येथे आली होती. त्यांनी दरवाजा ठोठावला, मात्र छायाने काही प्रतिसाद दिलानाही. त्यामुळे त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला होता. यावेळी त्यांना छायाने घरातील बेडरुमच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यांनी तिला खाली उतरवून तातडीने जवळच्या कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.

ही माहिती मिळताच वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी शंकुतला हगवणे हिची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यात तिने तिची मुलगा छाया हिचा तिचा पती सचिन आणि सासू सविता यांच्याकडून सतत कौटुंबिक कारणावरुन मानसिक व शारीरिक शोषण सुरु होता. या छळाला कंटाळून तिने तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येला ते दोघेही जबाबदार असल्याचा आरोप करुन त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सचिन बच्चे आणि त्याची आई सविता बच्चे यांच्याविरुद्ध पोलिसांनी छायाचा मानसिक व शारीरिक शोषण करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच सचिनला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे तर या गुन्ह्यांत सविता बच्चे हिला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. तिच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page