साडेबारा लाखांचे कॅमेरे-लेन्स चोरी करुन व्हिडीओग्राफरचे पलायन

आरोपी व्हिडीओग्राफरविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 जुलै 2025
मुंबई, – साडेबारा लाखांचे महागडे कॅमेरे, लेन्ससह इतर साहित्य घेऊन डिजीटल मार्केटिंग कंपनीच्या एका व्हिडीओग्राफरने पलायन केल्याची घटना जोगेश्वरी परिसरात उघडकीस आले आहे. याप्रकरणी मंदार गायकवाड या आरोपी व्हिडीओग्राफरविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे. तो त्याच्या सातारा येथील गावी पळून गेल्याची शक्यता असल्याने ओशिवरा पोलिसांची एक टिम तिथे जाणार असल्याचे सांगण्यात आले.

तरुण प्रदीपकुमार बंसल हे जोगेश्वरीतील ओशिवरा मैट्रो स्टेशनजवळ राहत असून त्यांचा डिजीटल मार्केटिंगचा व्यवसाय ाहे. ऑक्टोंबर 2017 रोजी त्याचा मित्र संजोग तिवारीने मध्यप्रदेशातील ग्वालेर शहरात हॅशटॅग ड्रिम इंटरटेनमेंट नावाची एक कंपनी सुरु केली होती. याच कंपनीत आत्मिका तिवारी ही मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कामाला आहे. फेब्रुवारी 2018 रोजी ती कंपनीच्या कामासाठी मुंबईत आली होती. मुंबईत आल्यानंतर ते तिच्यासोबत काम करत होते. मुंबई युनिट सुरु केल्यानंतर त्यांच्याकडे अनेक आर्टिस्ट कामासाठी येत होते. त्यामुळे त्यांनी प्राणी मिडीया नावाची एक डिजीटल कंपनी सुरु केली हेती. अंधेरीतील वर्सोवा, आर्शिवाद इमारतीमध्ये कंपनीचे एक कार्यालय सुरु करण्यात आले होते. मार्च 2019 रोजी त्यांनी अंधेरीतील कार्यालय जोगेश्वरी येथे शिफ्ट केले होते.

ऑक्टोंबर 2024 रोजी त्यांच्याकडे मंदार गायकवाड हा व्हिडीओग्राफर म्हणून नोकरीस लागला होता. कंपनीच्या कामासाठी मंदार हा स्वतचे खाजगी काम करत होता. त्याला त्यांचा विरोध नव्हता. मात्र खाजगी कामासाठी तो सतत सुट्टी असल्याने, महत्त्वाच्या शूटींगसाठी गैरहजर राहत होता. त्याचा त्यांच्या कामावर परिणाम होऊ लागला होता. मार्च 2025 रोजी मंदारने कंपनीच्या क्रेडिट कार्डवरुन 25 हजार रुपये काढले होते. या घटनेनंतर त्यांनी त्याला कामावरुन काढून टाकले होते. एप्रिल महिन्यांत त्यांचा दुसरा व्हिडीओग्राफर समेहन सुळे हा कार्यालयात आला होता. यावेळी त्याला काही कॅमेरे चालत नसल्याचे तसेच काही लेन्स तुटलेूले दिसले. त्यामुळे त्यांनी कॅमेर्‍यासह लेन्सची पाहणी केली सता ते कॅमेरे आणि लेन्स त्यांचे नव्हते.

कार्यालयात काम करताना मंदार गायकवाड याने कंपनीच्या पावणेसहा लाखांचे दोन सोनी कंपनीचे महागडे कॅमेरे, सव्वालाखांचे मेमरी कार्ड, कनेक्टर, चार्जेबल सेल, पाच लाखांचे सोनी कंपनीचे तीन लेन्स, डीजीआय कंपनीचे ग्मिबल असा 12 लाख 63 हजार रुपयांचा मुद्देमालाची चोरी करुन त्याजागी दुसरे कॅमेरे लेन्स ठेवले होते. त्याला कॉल केल्यानंतर त्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही. संबंधित मुद्देमाल चोरी करुन पळून गेला होता. त्यामुळे तरुण बंसल यांनी मंदार गायकवाडविरुद्ध ओशिवरा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. मंदार हा मूळचा सातारा येथील संभाजीनगर, सत्वशीलनगर, अरुणोदय सोसायटीचा रहिवाशी आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी ओशिवरा पोलिसांची एक टिम लवकरच सातार्‍याला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page