विवाहीत मैत्रिणीवर लैगिंक अत्याचार करुन दागिने पळविले
जबरी चोरीसह लैगिंक अत्याचारप्रकरणी मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 ऑगस्ट 2025
मुंबई, – विवाहीत मैत्रिणीवर लैगिंक अत्याचार करुन तिच्याकडील सोन्याचे दागिने मित्राने पलायन केल्याची घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी योगेश सुभाष बोरकर या 30 वर्षांच्या मित्राविरुद्ध डी. एन नगर पोलिसांनी जबरी चोरीसह लैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. योगेश हा बुलढाणा येथील गुमनी गावचा रहिवाशी असून या गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
25 वर्षांची पिडीत महिला ही अंधेरी परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. अलीकडेच तिचे एका तरुणासोबत लग्न झाले होते. आरोपी योगेश हा तिच्या परिचित असून त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते. या संबंधादरम्यान त्यांनी एकत्र अनेक फोटो काढले होते. त्यात काही अश्लील फोटोचा समावेश होता. बुधवारी 30 जुलैला त्याने तिला अंधेरीतील एका पार्कमध्ये बोलाविले होते. त्यामुळे ती त्याला भेटण्यासाठी तिथे गेली होती. या भेटीदरम्यान योगेशने तिला त्याच्यासोबत लग्न करण्याबाबत विचारणा केली होती.
मात्र तिने त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला होता. यावेळी त्याने त्यांच्यातील काही अश्लील फोटो तिच्या पतीसह इतर नातेवाईकांना तसेच सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर त्याने तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. या अत्यारानंतर तिच्याकडील सोन्याची चैन आणि अंगठी घेऊन तेथून पलायन केले होते. त्यानंतर त्याने त्यांच्यातील अश्लील फोटो तिच्या पतीला पाठवून तिची बदनामी केली होती.
हा प्रकार तिला तिच्याकडून पतीकडून समजताच तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने घडलेला प्रकार डी. एन नगर पोलिसांना सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.