ड्रग्ज तस्करीप्रकरणी आंतरराष्ट्रीय सिंडिकेटचा सदस्य दोषी
पंधरा वर्षांच्या कारावासासह दिड लाखांच्या दंडाची शिक्षा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 ऑगस्ट 2025
मुंबई, – हेरॉईन तस्करीप्रकरणी कारवाई करण्यात आलेल्या मापोआ लेमाओ या आंतरराष्ट्रीय सिंडिकेटचा सदस्य असलेला विदेशी नागरिकाला विशेष सेशन कोर्टाने दोषी ठरविले. याच गुन्ह्यांत त्याला पंधरा वर्षांच्या कारावासासह दिड लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आला आहे. तीन वर्षांत या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन आरोपीला शिक्षा झाल्याचे सांगण्यात आले.
12 एप्रिल 2022 रोजी मापोआ हा विदेशातून छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला गुप्तचर यंत्रणेला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या सामानाची झडती घेतल्यानंतर त्यात कोट्यवधी रुपयांचे चार किलो हेरॉईनचा साठा सापडा होता. हा साठा ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला या अधिकार्यांनी अटक केली होती.
तपासात मापोआ हा दक्षिण आफ्रिका आणि टांझानिया देशाच्या काही आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कराच्या संपर्कात होता. ही आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडीकेट असून या सिडिंकेटने अनेक देशांत ड्रग्जची तस्करी केल्याचे उघडकीस आले होते. अटकेनंतर त्याच्याविरुद्ध विशेष सेशन कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. गेल्या तीन वर्षांपासून खटल्याची नियमित सुनावणी सुरु होती.
अलीकडेच ही सुनावणी पूर्ण झाली. साक्षीदारांनी दिलेली साक्ष, फॉरेन्सिकचा अहवाल तसेच अन्य पुरावाच्या आधारे विशेष सेशन कोर्टाने त्याला ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत दोषी ठरविले होते. त्यानंतर त्याला कोर्टाने पंधरा वर्षांच्या कारावासासह दिड लाखांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.