मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
6 ऑगस्ट 2025
मुंबई, – गोल्ड-ड्रग्ज तस्करीप्रकरणी दोन प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम अधिकार्यांनी अटक केली. या कारवाईत या अधिकार्यांनी पाच कोटी दोन लाखांचा हायड्रोपोनिक ड्रग्जसह 1 कोटी 39 लाख रुपयांचे दिड किलो गोल्ड असा साडेसहा कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गेल्या काही वर्षांत विदेशातून ड्रग्ज आणि गोल्ड तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे अशा तस्कराविरोधात आंतरराष्ट्रीय विमानतळावर या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना बँकाँकहून काहीजण हायड्रोपोनिक ड्रग्जची तस्करी होणार असल्याची माहिती या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर बँकाँकहून येणार्या प्रत्येक संशयित प्रवाशांच्या सामानाची तपासणी सुरु केली होती. ही तपासणी सुरु असताना एका प्रवाशाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्या सामानाची तपासणी केल्यानंतर त्यात या अधिकार्यांना 5027 ग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक गांजाचा साठा सापडला.
आंतरराष्ट्रीय बाजारात याच गांजाची किंमत पाच कोटी दोन लाख रुपये इतकी किंमत आहे. हा साठा जप्त केल्यानंतर त्याच्यविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई ताजी असताना दुसर्या कारवाईत अन्य एका प्रवाशाला या अधिकार्यांनी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून या अधिकार्यांनी चार मेणातील 24 केटी गोल्ड डबा जप्त केला आहे. 1510 ग्रॅम वजनाच्या या गोल्डची किंमत 1 कोटी 39 लाख रुपये इतकी आहे. गोल्ड तस्करीप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होताच त्याला नंतर या अधिकार्यांनी अटक केली.