पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैगिंक अत्याचार
27 वर्षांच्या तरुणाला अटक तर पाच मुलांची बालसुधारगृहात रवानगी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
11 ऑगस्ट 2025
मुंबई, – पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच परिचित सहाजणांनी सामूहिक लैगिंक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार काळाचौकी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाच अल्पवयीन मुलासह सहाजणांविरुद्ध काळाचौकी पोलिसांनी सामूहिक लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत 27 वर्षांच्या आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली असून अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. इतर पाच अल्पवयीन मुलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांना पुढील कारवाईसाठी डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. रविवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
40 वर्षांची तक्रारदार महिला काळाचौकी परिसरात राहत असून तिचा स्वतचा व्यवसाय आहे. पंधरा वर्षांची पिडीत तिची मुलगी असून ती सध्या शिक्षण घेत आहे. गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यांत तिच्याच परिचित 27 वर्षांच्या आरोपी तरुणासह सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलाने जवळीक निर्माण करुन तिला त्यांच्या घरी आणले होते. घरी आणल्यानंतर या दोघांनी तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. तिचा विरोध असूनही त्यांनी तिच्यावर जबदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. तिचे मोबाईलवरुन काही अश्लील व्हिडीओ आणि फोटो काढले होते. तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला अश्लील फोटो पाठविण्यास प्रवृत्त करत होते. ही माहिती नंतर त्यांनी त्यांच्या इतर चार अल्पवयीन मित्रांना सांगितली होती. त्यानंतर या चौघांनीही तिला ब्लॅकमेल करुन तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. मोबदल्यात तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता.
ऑक्टोंबर 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत या सहाजणांनी तिच्यावर अनेकदा लैगिंक अत्याचार करुन तिला हा प्रकार कोणालाही सांगितला तर तिचे अश्लील फोटोसह व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. दोन दिवसांपूर्वी तिची अल्पवयीन मैत्रिण तिच्या घरी आली होती. यावेळी त्यांच्या संभाषणावरुन ही माहिती तिच्या तक्रारदार आईला समजली. त्यानंतर तिने तिचा मोबाईलची पाहणी केली होती. त्यात तिला तिचे काही अश्लील फोटो आणि व्हिडीओ दिसले. याबाबत तिने तिची विचारणा केल्यानंतर घडलेला प्रकार पिडीत मुलीने तिच्या आईला सांगितला.
ही माहिती ऐकल्यानंतर तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर तिने काळाचौकी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून सहाही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पाच अल्पवयीन मुलासह सहाजणांविरुद्ध सामूहिक लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच 27 वर्षांच्या आरोपीस पोलिसांनी अटक केली.
याच गुन्ह्यांत त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत मुलीच्या चौकशीनंतर इतर पाचही अल्पवयीन मुलांना पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले होते. ते सर्वजण सोळा ते सतरा वयोटातील असल्याने त्यांना नंतर डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते. पिडीत मुलीसह सर्व आरोपीची लवकरच मेडीकल होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.