मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
14 ऑगस्ट 2025
मुंबई, – अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या अपहरणासह लैगिंक अत्याचारप्रकरणी एका वीस वर्षांच्या तरुणाला कुर्ला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष सेशन कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत मुलीला उपचारासाठी सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिथेच तिची मेडीकल होणार आहे. नोकरीच्या आमिषाने आरोपी तरुणाने पिडीत मुलीच्या बहिणीला दुसर्या ठिकाणी पाठवून तिला वाशी नेऊन तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
तक्रारदार तरुणी ही अठरा वर्षांची असून ती तिच्या कुटुंबियांसोबत मानखुर्द परिसरात राहते. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने ती घरकाम करते. आरोपी तरुण गोवंडीतील बैंगनवाडी परिसरात राहत असून तो तिच्या परिचित आहेत. सोमवारी सायंकाळी पावणेचार वाजता तक्रारदार तरुणी ही तिच्या अकरा वर्षांच्या बहिणीसोबत कुर्ला रेल्वे स्थानकातून त्यांच्या घरी जाण्यासाठी आल्या होत्या. यावेळी तिथे आरोपी तरुण आला आणि त्याने तिला कॅटरर्सचे नोकरी मिळवून देतो असे सांगून तिला दुसर्या ठिकाणी नोकरीसाठी पाठविले. त्यानंतर तो तिच्या अकरा वर्षांच्या बहिणीला घेऊन नवी मुंबईतील वाशीच्या एका फ्लॅटमध्ये आला होता.
तिथेच त्याने तिच्याशी जवळीक निर्माण करुन तिच्याशी अश्लील चाळे केले होते. त्यानंतर तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगितला तर जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याने तिला तिच्या घरी आणून सोडून पलायन केले होते. घडलेला प्रकार तिने तिच्या तक्रारदार बहिणीला सांगितला. ही माहिती ऐकून तिला धक्काच बसला होता. त्यानंतर त्या दोघीही कुर्ला पोलीस ठाण्यात आले. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिने आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसंनी अपहरणासह लैगिंक अत्याचार आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच त्याला काही तासांत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावणत आली. पिडीत मुलीला उपचारासाठी सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.