बारा वर्षांच्या मुलावर सोळा वर्षांच्या मुलाकडून अत्याचार
गुन्हा दाखल होताच आरोपी मुलाची बालसुधारगृहात रवानगी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
20 ऑगस्ट 2025
मुंबई, – बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलावर त्याच्याच परिचित सोळा वर्षांच्या मुलाने अनैसगिक लैगिंक अत्याचार केल्याची घटना शिवडी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अनैसगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी मुलाला वडाळा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याला पुढील कारवाईसाठी डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
32 वर्षांची तक्रारदार महिला ही शिवडी परिसरात राहते. बारा वर्षांचा बळीत तिचा मुलगा आहे. याच परिसरात आरोपी सोळा वर्षांचा मुलगा असून तो तिच्या मुलाचा मित्र आहे. रविवार 10 ऑगस्टला ते दोघेही तिथे क्रिकेट खेळत होते. खेळताना आरोपी मुलगा बळीत मुलाला जवळच्या गोदामामध्ये घेऊन गेला होता. तिथे त्यांना त्याच्याशी अश्लील चाळे करुन अनैसगिंक लैगिंक अतचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस असेही त्याने त्याला सांगितले होते. या प्रकाराने तो प्रचंड घाबरला होता, त्यामुळे त्याने घडलेला प्रकार कोणालाही सांगितला होता. या मुलाच्या स्वभावात प्रचंड बदल झाला होता.
हा बदल त्याच्या आईच्या लक्षात आला होता. त्यामुळे तिने त्याच्याकडे विचारणा केल्यानंतर त्याने घडलेला प्रकार त्याच्या आईला सांगितला. या घटनेनंतर तिने शुक्रवारी 15 ऑगस्टला घडलेला प्रकार वडाळा पोलिसांना सांगून सोळा वर्षांच्या आरोपी मुलाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला सोमवारी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याला नंतर डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते.