फोर सिझन हॉटेलला बॉम्बस्फोटाच्या धमकीचा मेल

मेलधारकाकडून तामिळनाडू पोलिसांना युनियन करण्याची मागणी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 ऑगस्ट 2025
मुंबई, – वरळीतील प्रसिद्ध पंचताराकिंत हॉटेल फोर सिझनला अज्ञात व्यक्तीने मेलद्वारे बॉम्बस्फोट होणार असल्याचा धमकी दिल्याने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हॉटेलच्या व्हीआयपी रुममध्ये बॉम्ब ठेवण्यात आले असून सर्वांना तातडीने बाहेर काढा असा मजकूर देण्तया आला होता. मेलवरुन आलेल्या या धमकीनंतर संपूर्ण हॉटेलची बॉम्बशोधक व नाशक पथकासह श्वान पथकाकडून तपासणी करण्यात आली होती, मात्र तिथे काहीही संशयास्पद वस्तू सापडली नाही, त्यामुळे बॉम्बस्फोटाची ती अफवा असल्याचे उघडकीस आले. या घटनेनंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी बॉम्बस्फोटाची बोगस धमकीचा मेल पाठवून तणावाचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.

वरळी परिसरात फोर सिझन नावाचे एक पंचाताराकिंत हॉटेल आहे. या हॉटेलच्या व्हीआयपी रुममध्ये सात आरडीएक्स आणि आईडीद्वारे बॉम्बस्फोट घडविण्यात येणार आहे असा मेल राज्य कंट्रोल रुमला प्राप्त झाला होता. ही माहिती नंतर मध्य कंट्रोल रुम आणि स्थानिक पोलिसांना देण्यात आली होती. या माहितीनंतर स्थानिक पोलिसांनी बॉम्बशोधक नाशक पथकासह श्वान पथकाच्या मदतीने संपूर्ण हॉटेल रिकामे करुन तपासणी सुरु केली होती. मात्र संपूर्ण तपासणीनंतर तिथे काहीही आक्षेपार्ह सापडले नाही. त्यामुळे ती अफवा असल्याचे उघडकीस आले. तपासात आऊटलुटवरुन संबंधित व्यक्तीने मेलवरुन ही धमकी दिली होती. या धमकीमध्ये त्याने तामिळनाडू पोलिसांना युनियन करण्याची परवानगी देण्याची मागणी केली होती.

दरम्यान या घटनेने स्थानिक पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बोगस बॉम्बचा मेल पाठवून तणावाचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा सायबर आणि गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बॉम्बस्फोटाच्या निनावी कॉलमुळे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली आहे. प्रत्येक वेळेस धमकी आल्यानंतर पोलीस घटनास्थळी जाऊन पाहणी करतात, मात्र तो कॉल बोगस असल्याचे उघडकीस येते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page