मानसिक व शारीरिक शोषणाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी मावशीला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ एप्रिल २०२४
मुंबई, – मानसिक व शारीरिक शोषणाला कंटाळून स्वप्नील सदू हाडळ या २१ वर्षांच्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. या आत्महत्येप्रकरणी वंदना संतोष प्रसाद या महिलेस बुधवारी गोराई पोलिसांनी अटक केली. स्वप्नीनला मारहाण करुन शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त करुन त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा वंदनावर आरोप असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच गुन्ह्यांत अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

२३ वर्षांची सरीता सदू हाडळ ही तरुणी तिच्या आई-वडिल आणि दोन भावासोबत डहाणू येथील आंबेसरी, धुलसरपाडा परिसरात राहते. तिचे दोन भाऊ ड्रायव्हिंगचे काम करतात तर एक भाऊ स्वप्नील हा मनोरी गावातील डॉमनिका रिसॉर्ट हॉटेलमध्ये कुकचे काम करत होता. अनेकदा ती मनोरी येथे आल्यानंतर स्वप्नीलला भेटत होती. यावेळी तिची वंदनासोबत ओळख झाली होती. वंदना ही वयाने मोठी असल्याने स्वप्नीलसह सरीता तिला मावशी म्हणून हाक मारत होते. नोव्हेंबर २०२३ रोजी स्वप्नीलने डॉमनिका रिसॉर्टची नोकरी सोडून दुसर्‍या हॉटेलमध्ये काम सुरु केले होते. तेव्हापासून तो घरी जात नाही. १२ मार्च २०२४ रोजी स्वप्नील आणि वंदना यांच्यात भांडण झाले होते. ही माहिती सरीताला समजताच तिने वंदनाकडे चौकशी केली, मात्र तिने तिला काहीही माहिती दिली नाही. त्यामुळे तिने स्वप्नीला कॉल केला, मात्र त्याने तिचा कॉल घेतला नाही. काही वेळानंतर वंदनाने तिचा कॉल घेतला. आता स्वप्नील त्यांना भेटणार नाही किंवा त्यांना फोन करणार नाही असे सांगितले. याच दरम्यान स्वप्नीलचा जोरजोरात बोलण्याचा तिला आवाज ऐकू आला. वंदना मावशी त्याला मारहाण करत करते असे तो सांगत होता. त्यानंतर तिने फोन कट केला. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने तिच्या आई-वडिलांना ही माहिती सांगितली. त्यामुळे ते सर्वजण बोरिवलीतील गोराई परिसरात आले. वंदनाच्या घरी गेल्यानंतर तिने तिचे स्वप्नीलसोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगून त्यांच्यात शारीरिक संबंध आले आहेत. तो तिला सोडून गेला तर ती त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करेल अशी धमकी दिली. त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी ती गोराई पोलीस ठाण्यात गेली होती, मात्र तिने त्याच्याविरुद्ध तक्रार केली नाही. स्वप्नील तुमच्योबत येणार नाही. तो आता माझ्यासोबतच राहिल. त्याची सर्व जबाबदारी घेण्यास मी सक्षम असल्याचे तिने तिच्या कुटुंबियांना सांगितली. स्वप्नीलकडे केलेल्या चौकशीत त्याने त्याची वंदनासोबत चार वर्षांपूर्वी ओळख झाली होती. ती त्याला मारहाण करुन तिच्यासोबत जबदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त करते. तिच्याकडून त्याचा मानसिक व शारीरीक शोषण सुरु आहे. त्याला घरी जाऊ देत नाही, कोणाशी बोलू देत नाही. त्यामुळे तो प्रचंड कंटाळून गेला आहे असे मानसिक नैराश्यातून सांगितले. यावेळी त्यांनी त्याची समजूत काढून त्याला लवकरच घरी आणू असे सांगितले.

काही दिवसांनी स्वप्नीलने मानसिक नैराश्यातून १४ मार्चला सकाळी पावणेअकरा वाजता वंदनाच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. ही माहिती समजताच हाडळ कुटुंबिय तिथे गेले होते. यावेळी त्यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीत सरीताने स्वप्नीलच्या आत्महत्येस वंदना हीच जबाबदार असल्याचे सांगून ती मारहाण करुन त्याचा मानसिक व शारीरिक शोषण करत असल्याचा आरोप केला होता. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी वंदनाविरुद्ध मारहाण करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा गोराई पोलिसांकडून तपास सुरु होता. तपासानंतर बुधवारी वंदना प्रसादला पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर तिला दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page