विसर्जनाददरम्यान लालबाग-गिरगाव चौपाटीवर चोरट्यांची हातसफाई

200 हून अधिक मोाबईल आणि सोनसाखळी चोरट्यांनी पळवून नेले

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
8 सप्टेंबर 2025
मुंबई, – गणपती विजर्सनादरम्यान होणार्‍या गर्दीचा फायदा घेऊन यंदाही चोरट्यांनी भाविकांना चांगला इंगा दाखवत हातसफाई केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लालबाग आणि गिरगाव चौपाटी येथे मोबाईल आणि सोनसाखळी चोरीच्या दोनशेहून अधिक गुन्हे उघडकीस आले आहे. याप्रकरणी काळाचौकी, डी. बी मार्ग पोलीस ठाण्यासह इतर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध मोबाईलसह सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत सात रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडून चोरीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. इतर काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या अटकेने अशाच काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने इतर आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

दरवर्षी गणपती विसर्जनादरम्यान अशा चोरीच्या घटना घडत आहे. मात्र यंदा सर्वाधिक मोबाईल आणि सोनसाखळी चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. 27 ऑगस्टला आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन झाल्यानंतर 6 सप्टेंबररला अनंत चर्तुदर्शीला गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी लालबाग आणि गिरगाव चौपाटी परिसरात लाखो गणेशभक्त जमा झाले होते. लालबागचा राजासह इतर नामांकित मंडळाच्या गणपतीला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने लालबाग येथे गणेशभक्त आले होते. अशा गर्दीचा फायदा घेऊन मुंबईबाहेरुन येणार्‍या काही टोळ्या मोबाईल, सोनसाखळी आणि पाकिट चोरी करत असल्याने तिथे पोलिसांचा प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मात्र इतका तगडा बंदोबस्त असतानाही चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत हातसफाई केली होती. शनिवारी दिवसभरात लालबाग आणि गिरगाव चौपाटी येथे सोनसाखळी, मोबाईल आणि पाकिट चोरीच्या दोनशेहून अधिक गुन्हे घडले होते. हा प्रकार नंतर गणेशभक्तांच्या लक्षात येताच त्यांनी स्थानिक पोलिसांत मोठी गर्दी केली हेती. त्यांच्या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध वीसहून अधिक गुन्ह्यांची नोंद दाखल केले होते. याच गुन्ह्यांत सात आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. या आरोपींकडून चोरीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे.

अटक आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. लालबाग आणि गिरगाव चौपाटी येथे मोठ्या प्रमाणात सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. त्यामुळे या फुटेजच्या मदतीने इतर आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या फुटेजवरुन काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. गणपती विसर्जनादरम्यान गर्दी फायदा घेऊन दरवर्षी मोबाईल, सोनसाखळी आणि पाकिट चोरीच्या घटना घडत असून यातील बहुतांश टोळ्या मुंबईसह मुंबईबाहेर बाहेरील शहरात असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page