लग्नाच्या नऊ महिन्यांत पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या
आत्महत्येस प्रवृृत्त केल्याप्रकरणी आरोपी पतीला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
9 सप्टेंबर 2025
मुंबई, – गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत विवाह झालेल्या हिमानी सागर नारगोलकर या 28 वर्षांच्या महिलेच्या आत्महत्येप्रकरणी तिचा पती सागर रमेश नारगोलकर या 31 वर्षांच्या व्यावसायिकाला एमएचबी पोलिसांनी अटक केली. क्षुल्लक कारणावरुन मद्यप्राशन करुन पत्नीचा मानसिक व शारीरिक शोषण करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
राजेंद्रकुमारी विवेककुमार सिंग ही 65 वर्षांची वयोवृद्ध महिला उत्तरप्रदेशची रहिवाशी आहेत. तिला एक मुलगा आणि दोन मुली असून त्यापैकी हिमानी ही तिची तिची लहान मोठी आहे. डिसेंबर 2024 रोजी तिचे सागर नारगोलकर याच्याशी विवाह झाला होता. लग्नापूर्वी ते दोघेही एकमेकांच्या परिचित होते, त्यांच्यात चांगली मैत्री होती. अनेकदा सागर हा हिमानीच्या विवाहीत बहिण श्रुती देशमुख हिच्या मिरारोड येथे येत होता. याच दरम्यान त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. गेल्या सात वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याने हिमानीच्या आईने या दोघांच्या विवाहाला संमती दिली होती. त्यानंतर ऑक्टोंबर 2024 रोजी त्यांचा साखरपुडा झाला होता. मात्र साखरपुडा झाल्यानंतर सागरच्या स्वभावात प्रचंड बदल झाल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. तरीही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.
ठरल्याप्रमाणे डिसेंबर महिन्यांत या दोघांचे उत्तरप्रदेशातील सिटी गार्डन हॉलमध्ये विवाह झाला होता. लग्नातही सागर अॅटिट्यूटमध्ये वागत होता. हिमांनीच्या नातेवाईकांशी नीट बोलत नव्हता. तरीही तिच्यासह तिच्या कुटुंबियांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. लग्नानंतर हिमानी ही त्याच्या बोरिवलीतील आयसी कॉलनी, बी/501 मध्ये राहण्यासाठी आली होती. त्यानंतर ते दोघेही सिंगापूरला फिरायला गेले होते. यावेळी तो तिच्याशी क्षुल्लक कारणावरुन भांडण करत होता, सतत मद्यप्राशन करुन तिला एकटीला सोडून बाहेर एकटाच जात होता. हा प्रकार समजताच श्रुती तिच्या घरी गेली होती. यावेळी तिने हिमानीला बाहेर जेवणासाठी जाऊ असे सांगितले. मात्र सागरने त्यांना बाहेर जाण्यास नकार दिला.
श्रुतीशी वाद घालून त्याने तिला कुठे आणि कोणासोबत जायचे आहे ते मी ठरविणार असे सांगून तिला घरातून जाण्यास सांगितले. त्यानंतर तो हिमांशीशी सतत वाद घालून तिला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न कत होता. तिला मारहाण करत होता. लग्नाच्या काही दिवसांपासून सागरकडून तिचा सतत मानसिक व शारीरिक शोषण सुरु होता. त्यातून ती मानसिक तणावात होती. त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने 31 ऑगस्टला तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करुन जीवन संपविले होते. ही माहिती राजेेंद्रकुमारीसह श्रुतीला समजताच त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर त्या दोघीही हिमांनीच्या बोरिवलीतील राहत्या घरी आल्या होत्या.
या घटनेनंतर राजेंद्रकुमारी हिने एमएचबी पोलिसांत सागर नारगोलकर याच्याविरुद्ध तिच्या मुलीचा मानसिक व शारीरिक शोषण करुन, तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप करुन त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सागर नारगोलकरविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीनंतर त्याला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.