भांडणात मध्यस्थी करणार्या महिला शिपायाला कानशिलात लगावली
चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल तर वयोृद्ध महिलेसह तरुणीला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
13 सप्टेंबर 2025
मुंबई, – भांडणात मध्यस्थी करणार्या कांचन प्रताप पाईपराव या पोलीस शिपाई महिलेस कानशिलात लगावून मारहाण करुन सरकारी कामात अडथळा आणल्याचा धक्कादायक प्रकार चेंबूर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी चार महिलांविरुद्ध चुन्नाभट्टी पोलिसांनी भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन एका वयोवृद्ध महिलेसह तरुणीला अटक केली आहे. संघमित्रा ऊर्फ संजीवनी ऊर्फ संजू विठ्ठल कदम आणि जान्हवी कल्पेश सोनी अशी या दोघांची नावे असून त्या दोघीही चेंबूरच्या रहिवाशी आहेत. अटकेनंतर या दोघींनाही नोटीस सोडून देण्यात आले. या गुन्ह्यांत मोनाली विठ्ठल चव्हाण आणि समा विठ्ठल चव्हाण या दोघींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्यावरही लवकरच अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना शुक्रवारी रात्री पाऊणच्या सुमारास चेंबूर येथील सायन-ट्रॉम्बे रोड, उमरशी बाप्पा चौकात घडली. कांचन पाईपराव या नवी मुंबईतील ऐरोली परिसरात राहत असून सध्या चुन्नाभट्टी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. चेंबूरच्या नेहरुनगर, एसटी डेपोसमोरच जान्हवी सोनी ही 60 वर्षांची वयोवृद्ध महिला असून तिच्याच शेजारी चव्हाण कुटुंबिय राहतात. शुक्रवारी रात्री उशिरा या दोन्ही कुटुंबात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. दोन्ही बाजूने जोरजोरात आरडाओरड करुन शिवीगाळ केली जात होती.
हा प्रकार तिथे गस्त घालणाया काचन पाईपराव व त्यांच्या सहकार्यांना दिसताना त्यांनी त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. दोघांची समजूत काढत असताना या महिलांनी पोलीस गणवेशात असलेल्या कांचन पाईपराव यांनाच शिवीगाळ करुन त्यांच्या गालात जोरात चापट मारली तसेच हाताने मारहाण केली होती. त्यामुळे तेथील वातावरण अधिक तंग झाले होते. ही माहिती मिळताच चुन्नाभट्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी संघमित्रा आणि जान्हवी या दोघींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले तर इतर दोन महिला तेथून पळून गेल्या.
त्यांच्याविरुद्ध कर्तव्य बजाविणार्या महिला शिपायाला शिवीगाळ करुन मारहाण करणे, सरकारी कामात अडथळा आणणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच संघमित्रा कदम आणि जान्हवी कदम यांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले. दोन महिलांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.