मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 सप्टेंबर 2025
मुंबई, – दुबई टूरसाठी घेतलेल्या सुमारे साडेपाच लाखांच्या अपहार करुन एका डॉक्टर महिलेची फसवणुक केल्याप्रकरणी कांदबरी महेंद्र देवल या टूर आयोजक महिलेला चार महिन्यानंतर दिडोंशी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ती सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.
व्यवसायाने डॉक्टर असलेल्या मुग्धा सचिन ओंगले या गोरेगाव येथे राहतात. 2018 साली ती तिच्या पतीसोबत एका खाजगी टूर्स कंपनीमार्फत थायलंडला गेली होती. या ग्रुपमध्ये कांदबरी ही तिच्या ग्रुपची मॅनेजर म्हणून काम पाहत होती. त्यामुळे त्यांची तोंडओळख झाली होती. ते दोघेही सोशल मिडीयावर एकमेकांना फॉलो तसेच चॅट करत होते. काही दिवसांनी कांदबरीने ती कंपनी सोडून स्वतचा व्यवसाय सुरु केला होता. या व्यवसायाची माहिती तिने मुग्धा ओंगले हिला दिली होती. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यांत तिने कांदबरीला दुबई टूरची चौकशी करुन तिच्याकडे कोटेशन मागितले होते.
कोटेशन दिल्यानंतर तिने तिला लवकरात लवकर बुकींग करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे तिने तिला सहाजणांच्या विमान तिकिटासाठी दिड लाख रुपये पाठविले होते. यावेळी तिने तिला पंधरा दिवसांत तिकिट मिळतील असे सांगितले. काही दिवसांनी तिने तिच्याकडून व्हिसासाठी चाळीस हजार पाचशे रुपये घेतले. त्यानंतर तिने तिच्याकडून लॅड पॅकेजच्या पैशांची मागणी केली. त्यामुळे तिने तिला पुन्हा दिड लाख रुपये पाठविले होते. काही दिवसांनी कांदबरी दुबईला गेली होती. तिथे गेल्याने तिने तेथील लोकसंख्या, उष्णता आणि इतर बाबीबाबत चर्चा करुन त्यांना आता दुबई टूर न करता फेब्रुवारी महिन्यांत जाण्याचा सल्ला दिला.
यावेळी तिने सेम पॅकेजमध्ये तिला टूर पॅकेजचे आयोजन करते असे सांगितले. त्याने तिने तिच्याकडे हॉटेल बुकींग, साईट व्हिजीट, व्हाऊचर आणि विमान तिकिटाबाबत विचारणा केली होती. मात्र तिच्याकडून तिला काही प्रतिसाद मिळाला नाही. काही दिवसांनी तिने टूरसाठी 26 जणांचे व्हिसा कॅन्सल झाल्याचे सांगून तिला प्रचंड नुकसान होणार असल्याचे सांगितले.
हा प्रकार संशयास्पद वाटताच मुग्धा ओंगले हिने इतर टूर कंपन्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी तिला दुबई टूरसाठी काही अडचण येत नसल्याचे समजले. त्यामुळे तिने कांदबरीला कॉल करुन टूर पॅकेज कॅन्सल करुन तिचे पैसे परत करण्यास सांगितले, यावेळी तिने 80 टक्के पैसे कपात करुन उर्वरित पैसे देण्याचे आश्वासन दिले. दुबई टूरसाठी तिने मुग्धा ओंगलेकडून विमान तिकिट, व्हिजा, लॅड पॉलिसी कन्फर्मेशन, हॉटेल बुकींग, साईट व्हिजीट आदी कामासाठी साडेपाच लाख रुपये घेतले होते,
मात्र ही रक्कम परत न करता तिची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच तिने कांदबरीविरुद्ध दिडोंशी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी दुबई टूरच्या बहाण्याने एका डॉक्टर महिलेकडून घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत तिला चार महिन्यानंतर पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ती पोलीस कोठडीत असून तिची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.