इमिटेशन व्यावसायिकाच्या आत्महत्येचे गूढ कायम

साप चावल्याचा सांगून सी लिंकवरुन उडी घेतली होती

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
18 सप्टेंबर 2025
मुंबई, – अंधेरीतील इमिटेशन ज्वेलरी व्यावसायिक अमीत चौप्रा यांच्या आत्महत्येचे गूढ अद्याप कायम असून त्यांच्या पत्नीसह इतर कुटुंबियांची लवकरच वांद्रे पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. दोन दिवसांत टॅक्सीने वांद्रे-वरळी सी लिंकवरुन जाताना अचानक साप चावल्याचा बहाणा करुन अमीत चोप्रा हे टॅक्सीतून खाली उतरले आणि त्यांनी सी लिंकवरुन समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

अमीत चौप्रा हे अंधेरी परिसरात त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत होते. त्यांचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय होता. बुधवारी रात्री नऊ वाजता ते घरातून काही महत्त्वाचे काम असल्याचे निघून गेले होते. घरासमोरुन त्यांनी एक कॅब घेतली आणि वांद्रे-वरळी सी लिंकच्या दिशेने निघाले होते. सी लिंकवर आल्यानंतर त्यांनी कॅबचालकाला त्यांना सापने चावल्याचा बहाणा करुन कॅब थांबविण्यास सांगितली. त्यामुळे कॅब चालकाने कॅब थांबवली होती. त्यानंतर काही कळण्यापूर्वी अमीत चौप्रा हे कॅबमधून बाहेर आले आणि त्यांनी सी लिंकवरुन उडी घेतली होती. या प्रकाराने कॅबचालक प्रचंड घाबरला आणि त्यांनी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला ही माहिती दिली. या माहितीनंतर वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी कॅबमधून अमीतचा मोबाईलसह इतर दस्तावेज जप्त केले होते. त्यावरुन त्यांची ओळख पटली होती. त्यानंतर ती माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली होती. दुसर्‍या दिवशी सांताक्रुज समुद्रकिनार्‍यावर अमीत चौप्रा यांचा मृतदेह काही मच्छिमारांच्या निदर्शनास आला होता. त्यामुळे त्यांनी ही माहिती सांताक्रुज पोलिसांना दिली होती. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. अमीत यांच्या आत्महत्येने चोप्रा कुटुंबियांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे कोणीही जबानी देण्याच्या मनस्थितीत नाही.

अमीत हे रात्री उशिरापर्यंत त्यांच्या कुटुंबियांनी स्थानिक पोलिसांना ही माहिती देऊन त्यांची मिसिंग तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्यांचा शोध सुरु असताना त्यांचा मृतदेह सापडल्याची माहिती समजली होती. अमीत यांचा त्यांच्या भावासोबत इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय होता. त्यामुळे त्याची पोलिसांकडून जबानी नोेंदविण्यात आली आहे,

मात्र त्याच्याकडून आत्महत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही. अमीतवर कोणतेही कर्ज नव्हते, तो मानसिक तणावात आहे कधीच वाटले नाही. मग त्याने सी लिंकवरुन उडी घेऊन आत्महत्या केली असा प्रश्न चौप्रा कुटुंबियांना पडला आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नीसह इतर कुटुंबियांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीतून या आत्महत्येमागील कारणाचा शोध घेतला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page