कांदिवलीतील मंदिराच्या पुजार्याच गळफास घेऊन आत्महत्या
अल्पवयीन मुलीकडे शारीरिक सुखाची मागणी केल्याचे उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 सप्टेंबर 2025
मुंबई, – कांदिवलीतील एका मंदिराच्या पुजार्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. राजेश प्रेमनारायण गोस्वामी असे या 52 वर्षीय पुजार्याचे नाव असून त्याच्यावर एका अल्पवयीन मुलीने शारीरिक मागणी केल्याचा आरोप केला होता. याच गुन्ह्यांत अटकेच्या भीतीने त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जाते. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे. दरम्यान या तरुणीच्या तक्रारीवरुन मृत राजेश गोस्वामी यांच्याविरुद्ध लवकरच विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
राजेश हे कांदिवली परिसरात राहत असून याच परिसरात असलेल्या ताडकेश्वर महादेव नावाच्या शिवमंदिरात पुजारी म्हणून काम पाहत होते. शनिवारी सकाळी लालजीपाडा, गणेशनगरातील शिवमंदिरात त्यांनी गळफाास घेऊन आत्महत्या केल्याचे काही स्थानिक रहिवाशांच्या लक्षात आला होता. त्यामुळे त्यांनी ही माहिती कांदिवली पोलिसांना दिली होती. या माहितीनंतर घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी राजेश यांना तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता.
प्राथमिक तपासात राजेश हे परिसरात पुजारी म्हणून ओळखले जात होते. स्थानिक लोकांकडून त्यांचा प्रचंड सन्मान केला जात होता. याच परिसरात एक तरुणी तिच्या कुटुंबियांसोबत राहत होती. शिवभक्त असल्याने ती नियमित मंदिरात येत होती. राजेशसोबत त्यांच्या कौटुंबिक संबंध होते. शुक्रवारी रात्री त्याने तरुणीला कॉल करुन मंदिरात बोलाविले होते. तिच्याशी अश्लील संभाषण करुन त्याने तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली होती. या प्रकाराने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. प्रसंगावधान दाखवून तिने घरी जाऊन येते असे तेथून निघून गेली. घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या पालकांना सांगितला. त्यानंतर रात्री उशिरा तिच्या पालकांनी कांदिवली पोलिसांत आरोपी पुजार्याविरुद्ध तक्रार करण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्यांच्यासोबत त्यांची मुलगी पोलीस ठाण्यात आली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी त्यांना दुसर्या दिवशी मुलीला घेऊन येण्याचा सल्ला दिला होता. याच दरम्यान राजेश यांचा पोलिसांकडून शोध सुरु केला होता. ही माहिती त्यांना समजली होती. त्याच्या मुलाकडे विचारणा केल्यानंतर त्याने त्याचे वडिल गावी गेल्याचे सांगितले. दुसरीकडे ही माहिती राजेशला समताच तो प्रचंड भयभीत झाले, त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊन त्याला पोलीस अटक करतील अशी भीती वाटत असल्याने त्याने मंदिरातच पंख्याला गळफास घेऊन स्वतचे जीवन संपविले असावे असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी एडीआरची नोंद करुन पुढील चौकशी सुरु केली आहे. याप्रकरणी तक्रारदा तरुणीची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीनंतर राजेशविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.