पोक्सोच्या गुन्ह्यांतील दोन गुन्ह्यांत आरोपींना कारावास

दोघांनाही दहा व पाच वर्षांच्या कारावासासह दंडाची शिक्षा

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 सप्टेंबर 2025
मुंबई, – अपहरणासह लैगिंक अत्याचार तसेच अपहरणासह जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या पोक्सोच्या दोन स्वतंत्र गुन्ह्यांत विशेष सेशन कोर्टाने दोन्ही आरोपींना कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. त्यात शुभम अशोक तायडे आणि प्रकाश रामचंद्र खाडे यांचा समावेश आहे. यातील शुभमला दहा वर्षांची तर प्रकाशला पाच वर्षांच्या कारावासासह दंडाची, दंडाची रक्कम न भरल्यास आणखीन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

चार वर्षांपूर्वी चेंबूर येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर शुभमने जवळच्या एका लैगिंक अत्याचार केला होता. तिने त्याच्यावर दोन वेळा लैगिंक अत्याचार केला होता. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास बघून घेण्याची धमकी दिली होती. त्यामुळे भीतीपोटी तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. मात्र ती गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तिच्या पालकांच्या तक्रारीवरुन चेंबूर पोलिसांनी शुभमविरुद्ध अपहरणासह लैगिंक अत्याचार, जिवे मारण्याची धमकी देणे आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल झाल्यानंतर या खटल्याची नियमित सुनावणी सुरु होती.

अलीकडेच या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आणि विशेष सेशन कोर्टाच्या न्या. एम. एम देशपांडे यांनी शुभम तायडे याला दोषी ठरविले होते. त्यानंतर त्याला न्यायालयाने दहा वर्षांच्या कारावासासह पाच हजाराचा दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास त्याला आणखीन तीन महिने कारावास भोगावा लागणार आहे.

या गुन्ह्यांचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक ललित दळवी, पोलीस निरीक्षक शितल कदम (सध्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत) यांनी केला तर न्यायालयीन कामकाज पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय कुंभार, सहाय्यक फौजदार विनोद म्हात्रे, पोलीस हवालदार बापू पडळकर, महिला पोलीस शिपाई दिपाली माळी यांनी पाहिल्याचे पोलीस निरीक्षक मनिष आवळे यांनी सांगितले.

59 वर्षांच्या आरोपीस विनयभंगप्रकरणी कारावास
विनयभंगासह पोक्सोच्या अन्य एका गुन्ह्यांत दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टाने प्रकाश खाडे याला पाच वर्षांच्या कारावासासह एक हजार रुपयांचा दंड आणि दंडाची रक्कम न भरल्यास आणखीन चार महिने साधी कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.

यातील बळीत मुलगी ही मालाड येथे राहत असून तिच्याशी अश्लील चाळे करुन आरोपीने तिचा विनयभंग केला होता. याप्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात विनयभंगासह धमकी देणे आणि पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यांत नंतर प्रकाश रामचंद्र खाडे या 59 वर्षांच्या आरोपीस पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याविरुद्ध नंतर दिडोंशीतील सत्र न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. याच खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्याने न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी, कोर्ट कारकून यांनी सरकारी अभियोक्ता यांच्याशी समन्वय साधून या गुन्ह्यांतील रासायनिक विश्लेषन अहवाल, वैद्यकीय तपासणी अहवाल आणि गुन्ह्यांत जप्त केलेला मुद्देमाल न्यायालयात सादर केला होता. सुनावणीदरम्यान आठ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली होती. त्यामुळे न्यायालयाने आरोपीला पाच वर्षांच्या कारावासासह एक हजार रुपयांच्या दंडाची तसेच दंडाची रक्कम न भरल्यास आणखीन चार महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.

या गुन्ह्यांचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, नंदकिशोर क्षीरसागर यांनी केला तर न्यायालयीन कामकाज पैरवी अधिकारी व पोलीस उपनिरीक्षक मंगेश सांगळे, कोर्ट कारकून ज्योत्सना कदम, पोलीस शिपाई संतोष जाधव, रोशन आदवडे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page