मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 सप्टेंबर 2025
मुंबई, – मालाड येथे अबतुलाह बेग या तरुणावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. याा गोळीबारात एक गोळी त्याच्या चेहर्याला चाटून गेल्याने तो जखमी झाला होता. त्याच्यावर जे. जे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी कुरार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत. गोळीबारामागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही, मात्र गोळीबाराच्या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अबूतलाह बेग हा मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरात राहतो. सकाळी तो त्याच्या मित्रासोबत संजयनगर, बैद कंपाऊंडजवळ बसला होता. याच दरम्यान तिथे आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्याच्या दिशेने गोळीबार केला. गोळीबारानंतर आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. त्याच्या चेहर्याला एक गोळी चाटून गेल्याने बेग हा जखमी झाला होता. रक्तबंबाळ झालेल्या बेगला त्याच्या मित्रांनी एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे प्राथमिक औषधोपचारानंतर त्याला जे. जे हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तिथे त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गोळीबाराची माहिती मिळताच कुरार पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी पोलिसांना एक रिकामी पुंगळी सापडली आहे. या पुंगळीनंतर तिथे गोळीबार झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी अबतुुलाह बेगची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली असून त्याच्या जबानीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह आर्म्स अॅक्ट कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा गोळीबार कोणी केला,
गोळीबारामागील कारण काय याचा उलघडा होऊ शकला नाही. पूर्ववैमस्नातून हा गोळीबार झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.