महिलेची लैगिंक अत्याचारानंतर हत्या करणार्या नराधमाला अटक
हत्येनंतरही महिलेवर लैगिंक अत्याचार केल्याचे तपासात उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
30 सप्टेंबर 2025
मुंबई, – लैगिंक अत्याचारानंतर एका 46 वर्षांच्या सेक्स वर्कर महिलेची गळा आवळून हत्या करणार्या नराधमाला मालवणी पोलिसांनी उत्तरप्रदेशातील आग्रा शहरातून अटक केली. चंद्रपाल रामखिलाडी सिंग ऊर्फ नेता असे या 34 वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने 6 ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. लैगिंक अत्याचारादरम्यान झालेल्या वादानंतर त्याने तिची गळा आवळून हत्या केली होती. तिच्या हत्येनंतरही त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती तपाासत समोर आली आहे.
25 सप्टेंबरला मालाडच्या मालवणी चर्चजवळील मार्वे रोड, जरीमरी मंदिर, सावंत कपाऊंडजवळ एक महिला बेशुद्धावस्थेत पडली असून तिची काहीच हालचाल नव्हती. हा प्रकार संशयास्पद वाटताच एका दक्ष नागरिकाने ही माहिती मालवणी पोलिसांना दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांना एक महिला बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यामुळे तिला पोलिसांनी तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर या महिलेची गळा आवळून हत्या तसेच तिच्यावर लैगिंक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले होते. या अहवालानंतर मालवणी पोलिसांनी अज्ञात मारेकर्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
घटनास्थळी पोलिसांना कुठेही सीसीटिव्ही कॅमेरे दिसले नव्हते. त्यामुळे तपासात पोलिसांना अनेक अडचणी येत होते. एका पेट्रोलपंपाची फुटेज पाहिल्यानंतर पोलिसांना एक रिक्षा दिसली होती. या रिक्षाचा क्रमांक स्पष्ट दिसत नव्हता. तरीही पोलिसांनी रिक्षाची माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता. चौकशीत चंद्रपाल सिंग याचे नाव समोर आले होते. चंद्रपाल हा रिक्षाचालक असून त्याने रिक्षा त्याच्या मालकाकडे सोपवून त्याच्याकडून सतराशे रुपये घेतले होते. त्यानंतर तो अचानक गायब झाला होता. चंद्रपाल हा मूळचा उत्तक्षरप्रदेशचा रहिवाशी होता, मात्र तो उत्तरप्रदेशला पळून गेला असावा असा पोलिसांचा अंदाज होता.
दुसरीकडे या लैगिंक अत्याचारासह हत्येची पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप जाधव यांनी गंभीर दखल घेत मालवणी पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस निरीक्षक जीवन भातकुले, पोलीस उपनिरीक्षक उपनिरीक्षक अरुण सावंत, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रथमेश विचारे, हरिश शिळमकर, गुंडा विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक डॉ. दिपक हिंडे, एटीएसचे पोलीस उपनिरीक्षक मासाळ, पोलीस हवालदार रुपेश कांबळी, अभिमन्यू गव्हाणे, रबिल शेख, सावंत, मेहर, देखरुखकर, पाटील, पोलीस शिपाई गणेश शिंदे, सागर टर्के, दिपक कोल्हा, संदीप तिकांडे, पठाण, आमटे, पाटील, भंडारी, साजिद, खुडे, देसाई, कांबळी आदी पोलिसांचे तीन टिम बनविण्यात आले होते.
या टिमला मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशात पाठविण्यात आले होते. उत्तरप्रदेशात गेलेल्या टिमला चंद्रपालची माहिती प्राप्त होती. या माहितीनंतर चंद्रपालला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच या महिलेची हत्या केल्याची कबुली दिली. मृत महिला ही कांदिवलीतील चारकोप परिसरात तिच्या आई, भाऊ आणि मुलीसोबत राहत होती. तिच्याकडे काम नसल्याने ती सेक्स वर्कर म्हणून काम करत होती. गुन्ह्यांची रात्री ती मार्वे रोड परिसरात ग्राहकाच्या शोधात होती. त्याच वेळेस तिथे चंद्रपाल हा आला होता. त्याने तिच्याशी पैशांवरुन बोलणी करुन तिला रिक्षातून घटनास्थळी घेऊन आला होता. तिथे सेक्सदरम्यान त्यांच्यात वाद सुरु झाला होता. चंद्रपाल हा दारुच्या नशेत होता. त्यात त्याला सेक्सची नशा चढली होती. त्यामुळे त्यांच्यातील वादानंतर त्याने त्याची गळा आवळून हत्या केली होती.
तिचा मृत्यू झाल्यानंतरही तो तिच्यावर लैगिंक अत्याचार करत होता. मात्र काही वेळानंतर त्याला त्याच्या हातून तिची हत्या झाल्याचे समजले. त्यामुळे तो प्रचंड घाबरला आणि तेथून पळून गेला होता. तपासात आलेल्या माहितीनंतर चंद्रपालला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला सोमवार 6 ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु असून या चौकशीतून पोलिसांनी जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्यावर भर दिला आहे. या गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक जीवन भातकुले हे करत आहेत.