स्वस्तात युएसडीटी देण्याच्या आमिषाने व्यापार्याची फसवणुक
चार महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या आरोपीस अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – स्वस्तात युएसडीटी देण्याच्या आमिषाने एका फॅशन ज्वेलरी व्यापार्याची दहा लाखांची फसवणुक कटातील एका मुख्य वॉण्टेड आरोपीस जुहू पोलिसांनी अटक केली. सोहेब शकील खान असे या आरोपीचे नाव असून यापूर्वी याच गुन्ह्यांत त्याचा दुसरा सहकारी मोहम्मद शाहिद मोहम्मद हारुण खान याला पोलिसांनी अटक केली होती. सोहेब, साहिद आणि राहिल नूर या तिघांनी तक्रारदाराला फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर सोहेबला लोकल कोर्टाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याच्या चौकशीतून अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जिगर चंद्रेश ढाबालिया यांचा फॅशन ज्वेलरी विक्रीचा व्यवसाय असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत विलेपार्ले येथे राहतात. एप्रिल 2025 रोजी त्यांच्या परिचित पीए जिगर वाघेला यांचा त्यांना कॉल आला होता. त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीकडे युएसडीटी आहेत, त्याची तो स्वस्तात विक्री करत आहे, तुम्ही इच्छुक असाल तर युएसडीटी खरेदी करा. त्यात त्यांना चांगला फायदा होईल ए सांगितले. त्यानंतर त्यांनी त्यांना सोहेब खान आणि राहिल नूर याचा मोबाईल क्रमांक दिला होता. सोहेब हा युएसडीटीचा व्यवसाय करत असून त्याचा डेमो देण्यासाठी त्यांनी त्यांना जुहू येथील सन अॅण्ड सॅण्ड हॉटेलमध्ये बोलाविले होते.
दुसर्या दिवशी ते त्यांना भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेले होते. हॉटेलच्या लॉबीमध्ये त्यांच्यात युएसडीटी डॉलरबाबत सविस्तर चर्चा झाली होती. त्यांच्यावर विश्वास बसल्याने त्यांनी त्यांच्याकडून युएसडीटी घेण्याचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांना त्यांच्या बँक खात्यात त्यांना दहा लाख रुपये पाठविण्यास सांगितले होते. त्यामुळे त्यांन सोहेब आणि राहिलच्या सांगण्यावरुन मोहम्मद शाहिदच्या बँक खात्यात एनईएफटीद्वारे दहा लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. ही रक्कम ट्रान्स्फर होताना ते दोघेही युएसडीटी देतो सांगून निघून गेले आणि परत आले नाही. त्यांनी त्यांची बराच वेळ वाट पाहिली, मात्र ते तिघेही तिथे आले नाही.
कॉल केल्यानंतर त्यांनी त्यांच्या कॉलला प्रतिसाद दिला नाही. स्वस्तात युएसडीटी देतो असे सांगून या तिघांनी त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी सायबर सेल हेल्पलाईलसह जुहू पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी सोहेब खान, राहिल नूर आणि मोहम्मद शाहिद या तिन्ही आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना मोहम्मद शाहिदला पोलिसांनी अटक केली होती. चौकशीत त्याच्याच बँक खात्यात ही ट्रान्स्फर झाली होती. मोहम्मद शाहिद हा मालाडच्या मालवणीतील म्हाडा वसाहतीत राहत असून फिटनेस ट्रेनर म्हणून काम करतो. त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी इतर दोघांचा शोध सुरु केला होता. या गुन्ह्यांत सहा महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या सोहेब खान याला बुधवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला सोमवार 6 ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.