मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
4 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – भरवेगात जाणार्या एका अज्ञात वाहनाच्या धडकेने लालचंद राम उजागीर या 36 क्लिअर व्यक्तीचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक पळून गेल्याने त्याचा शिवडी पोलिसांकडून शोध सुरु आहे. याप्रकरणी आरोपी चालकाविरुद्ध पोलिसांनी हलगजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
हा अपघात बुधवारी रात्री अकरा वाजता शिवडी येथील हाजीबंदर रोड, लबीएस कॉलेजवळील एचपीसीएल कंपनीच्या बाजूला झाला. 30 सप्टेंबरला रात्री साडेअकरा वाजता मलिक भपाती हाश्मी नावाच्या एका व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला कॉल करुन एचपीसीएल कंपनीजवळ एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडला असल्याची माहिती होती. कंट्रोल रुममधून ही माहिती प्राप्त होताच शिवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी तिथे एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला तातडीने केईएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
रात्री एक वाजता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. काही वेळानंतर मृत व्यक्तीची पटली. त्याच्या परिचित अजीज जमील शाह याने मृत व्यक्तीचे नाव लालचंद उजागीर असल्याचे सांगून तो त्याच्याच टँकरमध्ये क्लिअर म्हणून कामाला होता. लालचंद हा मूळचा उत्तरप्रदेशच्या सिद्धार्थनगर, कदिराबाद, चांद बांगवाचा रहिवाशी आहे. सध्या तो त्याच्यासोबत राहत होता. घटनेच्या वेळेस तो एचपीसीएल कंपनीजवळ होता. यावेळी भरवेगात जाणार्या एका अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली होती.
या अपघातात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. जखमी झालेल्या लालचंदला आरोपी चालकाने कुठलीही वैद्यकीय मदत न देता तसेच पोलिसांना अपघाताची माहिती न कळविता तेथून पलायन केले होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर सहाय्यक फौजदार विलास वसंत विचारे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध हलगर्जीपणाने वाहन चालवून एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर चालक पळून गेल्याने परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या चालकाच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.