मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – पाणी पिण्याचा बहाणा करुन एका पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलावर त्याच्याच परिचित आरोपीने अनैसगिंक लैगिंक अत्याचार केल्याची घटना अॅण्टॉप हिल परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अॅण्टॉप हिल पोलिसांनी अनैसगिंक लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवून 50 वर्षांच्या आरोपीस अटक केली आहे. अटकेनंतर त्याला पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी सकाळी हा प्रकार घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
33 वर्षांची तक्रारदार महिला ही तिच्या कुटुंबियांसोबत अॅण्टॉप हिल परिसरात राहते. बळीत हा तिचा पंधरा वर्षांचा मुलगा आहे. याच परिसरात आरोपी राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. गुरुवारी 2 सप्टेंबरला सकाळी साडेअकरा वाजता आरोपीने बळीत मुलाला पाणी पिण्याच्या बहाण्याने तो राहत असलेल्या ठिकाणी जबदस्तीने घेऊन आला. तिथे आल्यानंतर त्याने त्याचे कपडे काढून त्याच्याशी अनैसगिक लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस असे सांगून त्याने त्याला सोडून दिले होते.
हा प्रकार मुलाकडून त्याच्या आईला समजताच तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर तिने अॅण्टॉप हिल पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला गुरुवारी रात्री पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शुक्रवारी पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.