विमानतळावर हायड्रोपोनिक गांजा-ड्रोन व वन्यजीव प्राणी जप्त
बँकॉक-कोलंबोहून आलेल्या पाच प्रवाशांना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
6 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – बँकाँकसह कोलंबो येथून आणलेल्या कोट्यवधी रुपयांच्या हायड्रोपोनिक गांजा, महागडा ड्रोन आणि वन्यजीव आदी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने जप्त केला आहे. एकूण पाच कारवाईत या अधिकार्यांनी विदेशातून आलेल्या पाच प्रवाशांना अटक केली आहे. त्यांच्यावर विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत या अधिकार्यांनी 3 कोटी 86 लाखांचे हायड्रोपोनिक गांजा, 32 लाखांचा महागडा ड्रोन जप्त केल्याचे सांगण्यात आले.
गेल्या काही वर्षांत विदेशातून ड्रग्ज, गोल्ड, वन्यजीव तसेच इतर महागड्या वस्तूंची तस्करी होत असल्याने अशाच प्रवाशांविरुद्ध सीमा शुल्क विभागाने विशेष मोहीम हाती घेतली होती. 4 ऑक्टोंबर आणि 5 ऑक्टोंबरला तीन वेगवेगळ्या कारवाईत या अधिकार्यांनी बँकाँकहून आलेल्या तीन प्रवाशांना अटक केली होती. या प्रवाशांकडून 3 कोटी 86 लाखांचे हायड्रोपोनिक गांजाचा साठा जप्त केला आहे. हा गांजा ते चेक-इन-ट्रॉलीमध्ये लपवून आणला होता, मात्र विमानतळाबाहेर जाण्यापूर्वीच या तिन्ही प्रवाशांना या अधिकार्यांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर त्यांना किल्ला कोर्टाने न्यायालयाने न्यायालयी कोठडी सुनावली आहे.
अन्य एका कारवाईत कोलंबो येथून आलेल्या एका प्रवाशाला या अधिकार्यांनी ताब्यात घेतले होते. त्याच्या सामानाच्या झडतीत या अधिकार्यांना 32 लाख 17 हजाराचा महागडा ड्रोनसह इतर साहित्य सापडले. त्याने ते ड्रोन ट्रॉली बॅगेतून आणले होते. अशाच पाचव्या कारवाई एका प्रवाशाला या अधिकार्यांनी ताब्यात घेतले होते. त्याने बँकाँकहून काही वन्य प्राण्याची तस्करी केल्याचे उघडकीस आले. या कारवाईत या अधिकार्यांनी 19 इग्रुआना, दहा नारंगी दाढीवाले ड्रगन, एक मृत रॅकून, एक क्विन मॉनिटर सरडा, तीन खारी आणि दोन मृत अमेरिकन खारी जप्त केले होते. त्याच्याविरुद्ध वन्यवजीव संरक्षण कायदा कलमातर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.