मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ एप्रिल २०२४
मुंबई, – सतरा वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच मित्राने लैगिंक अत्याचार केल्याची घटना अंधेरी परिसरात घडली. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच २१ वर्षांच्या आरोपीला अंधेरी पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. ही मुलगी अडीच महिन्यांची गरोदर असल्याचे पोलिसांकडून सांगणयात आले.
पिडीत मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात राहत असून एकमेकांच्या परिचित आहेत. ते दोघेही एका नाईट हायस्कूलमध्ये शिक्षण घेतात. मुलगी आठवीत तर मुलगा दहावीत शिकतो. अनेकदा ते दोघेही घरातून शाळेत एकत्र जात होते. त्यातून त्यांची चांगली मैत्री झाली होती. काही दिवसांपूर्वी त्याने तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस असेही त्याने तिला सांगितले होते. त्यामुळे तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. अलीकडेच ही मुलगी गरोदर असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे तिच्या आईने तिला डॉक्टरांकडे नेले होते. यावेळी डॉक्टरांनी ती अडीच महिन्यांची गरोदर असल्याचे सांगितले. त्यानंतर तिने अंधेरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता. यावेळी तिने तिच्या मुलावर आरोपीने जबदस्तीने लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. तिच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला गुरुवारी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. लवकरच या दोघांची मेडीकल होणार आहे.