दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात हाय अलर्ट जारी

सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तर नाकाबंदीसह गस्तीवर भर देण्याचे आदेश

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 नोव्हेंबर 2025
मुंबई, – लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळील एका कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटानंतर दिल्ली शहर हादरले, या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर देशभरात प्रमुख शहरांना विशेषता मुंबई शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्लीनंतर देशभरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्वच पोलीस प्रमुखांना सतर्कचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबदारीचा इशारा देण्यात आल्याचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडून देण्यात आला आहे. सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि एटीएसला जास्तीत जास्त नाकाबंदी आणि कोम्बिंब ऑपरेशनवर भर देण्याचे आदेश दिले आहेत. संशयित प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी करा असा आदेश वरिष्ठांकडून देण्यात आला आहे.

सोमवारी सायंकाळी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळील एका कारमध्ये भीषण स्फोट झाला होता. त्यात या कारसह आजूबाजूच्या काही कारचे प्रचंड नुकसान झाले होते. स्फोटात बाराहून तर तीसहून अधिक लोक जखमी झाल्याचे बोलले जाते. या घटनेनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा, स्थानिक पोलीस, गुन्हे शाखेसह इतर भारतीय यंत्रणेतील अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दिल्लीतील स्फोटानंतर मुंबई शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, घातपात घडू नये म्हणून पोलीस सज्ज आहेत. सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील सर्व शासकीय, निमशासकीय इमारती, धार्मिक स्थळे, महत्त्वाचे रेल्वे स्थानक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानतळावरील बंदोबस्तात अचानक वाढ करण्यात आली आहे.

स्थानिक पोलिसांना नाकाबंदी, गस्त आणि कोम्बिंग ऑपरेशनवर भर देण्याचे आदेश देण्यात आले आहे. कुठल्याही संशयित वस्तूंना हात लावू नका, संशयित व्यक्तीची माहिती स्थानिक पोलिसांना द्यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले. मुंबई पोलिसांसह रेल्वे पोलिसांना सतर्कचा इशारा देण्यात आला आहे. शहरातील सर्वच मुख्य रेल्वे स्थानकावरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. संशयित प्रवाशांची चौकशी केली जात आहे. त्यांच्याकडील सामानाची श्वान पथकाच्या मदतीने तपासणी केली जात आहे.

कुठल्याही अफवांवा विश्वास न ठेवता मुंबईकरांनी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. दुसरीकडे मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी खबदारीचा इशारा देण्यात आला असून बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page