मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
26 नोव्हेंबर 2025
मुंबई, – एकाच रुमवर तिघांकडून हेव्ही डिपॉझिट म्हणून सुमारे अकरा लाख रुपये घेऊन फसवणुक झाल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आलाद आहे. याप्रकरणी आरोपी मायलेकाविरुद्ध निर्मलनगर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. परवेज अहमद अजीमुल्ला हाश्मी आणि नूरजहाँ अजीमुल्ला हाश्मी अशी मायलेकाचे नावे असून या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या दोघांनी तक्रारदारासह अन्य काही लोकांची फसवणुक केल्याचे बोलले जाते.
27 वर्षांची आफरीनबानो मोहम्मद जाफर कुरेशी ही महिला तिच्या कुटुंबियांसोबत भिवंडी परिसरात राहते. तिचे पती अपंग असून ते टेलर म्हणून काम करतात. माहीम परिसरात त्यांचे काम असल्याने त्यांना भिवंडी येथून माहीमला जाणे त्रासदायक होत होते. त्यामुळे तिला वांद्रे येथील बेहामनगर येथे भाड्याने रुमची गरज होती. त्यासाठी तिच्यासह तिच्या पतीचे प्रयत्न सुरु होते. ऑक्टोंबर 2023 रोजी तिच्या पतीची परवेजशी ओळख झाली होती. त्याने त्याची आई नूरजहाँ हिच्या मालकीचा वांद्रे येथील बेहरामनगर, मकराणी गल्ली येथे एक रुम आहे. तोच रुमला त्यांना हेव्ही डिपॉझिटवर देण्याचे आश्वासन दिले होते.
रुमची पाहणी केल्यानंतर त्यांनी त्याचा रुम हेव्ही डिपॉझिटवर घेण्याचे ठरविले होते. ठरल्याप्रमाणे त्यांनी परवेज आणि नूरजहाँला चार लाख रुपये दिले होते. त्यानंतर तयांच्यात अकरा महिन्यांचा लिव्ह अॅण्ड लायसन्सचा एक करार झाला होता. करारादरम्यान त्यांनी त्यांना दोन महिन्यांत रुमचा ताबा देण्याचे मान्य केले होते. मात्र दोन महिने उलटूनही त्यांनी रुमचा ताबा दिला नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी त्यांना रुमचा ताबा देईपर्यंत त्यांना नऊ हजार रुपये भाडे देण्याचे आश्वासन दिले, ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांना दोन महिने भाड्याची रक्कम दिली. मात्र नंतर त्याने त्यांना भाडे देणे बंद केले होते. त्यामुळे तिचे पती तिच्या घरी गेले होते. यावेळी तिच्या सूनेने नूरजहाँ तिथे राहत नसल्याचे सांगितले.
याच दरम्यान त्यांना त्यांचा परिचित सुल्तानअली सिद्धीकी आणि मोहम्मद इम्रान मोईन इंद्रीसी यांच्याकडूनही परवेज आणि नूरजहाँ यांनी त्यांचा रुम हेव्ही डिपाझिटवर देतो असे सांगून साडेतीन लाख आणि तीन लाख रुपये घेतले होते. अशा प्रकारे या मायलेकांनी तिघांकडून तिघांकडून हेव्ही डिपॉझिट म्हणून अकरा लाख रुपये घेतले होते, मात्र कोणालाही रुमचा ताबा दिला नाही किंवा हेव्ही डिपॉझिट म्हणून घेतलेले पैसे परत केले नाही.
हा प्रकार लक्षता येताच आफरीनबानो कुरेशी हिने निर्मलनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर परवेज हाश्मी आणि नूरजहाँ हाश्मी यांच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.