क्रेडिटवर दिलेल्या 1.12 कोटीच्या हिर्यांचा अपहार
हिरे व्यापार्यासह पत्नीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 डिसेंबर 2025
मुंबई, – क्रेडिटवर दिलेल्या एक कोटी बारा लाखा रुपयांच्या हिर्यांचा अपहार करुन एका व्यापार्याची फसवणुक झाल्याचा प्रकार दादर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी हिरे व्यापार्यासह त्याच्या पत्नीविरुद्ध दादर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. अजेंश सिंधवा आणि काजल सिंधवा अशी या दोघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. अजेंशने अशाच प्रकारे इतर काही व्यापार्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून संमातर तपास सुरु आहे.
पद्युत अनंत कोले हे दादर येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. 1997 साली कोलकाता येथून वाणिज्य शाखेची पदवी घेतलयानंतर त्याने दिड वर्ष हैद्राबाद येथे बिकास पात्रा यांच्याकडे कारागिर म्हणून कामाचे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर त्याने अंधेरीतील सिप्झसह इतर ज्वेलरी कारखान्यात काम केले होते. सध्या त्याचा अंधेरीतील एमआयडीसी, म्युनिसिपल कॉलनीत हिरेजडीत दागिने बनविण्याचा एक युनिट आहे. त्याचे बहुतांश सोन्याचे दागिने हैद्राबाद विक्रीसाठी पाठविले जाते. तिथे जास्त व्यवसाय असल्याने त्याने धानसी बाजार, चारमिनार येथे त्याचे युनिट स्थालंरीत केले होते.
2023 रोजी त्याने हैद्राबाद येथे एक फ्लॅट घेतला होता. हिरे खरेदीसाठी तो अनेकदा मुंबईत येत होता. याच दरम्यान त्याच्या भावाने त्याची ओळख अजेंश सिंधवाशी करुन दिली होती. अजय हा हिरे व्यापारी असून तो हिर्यांची खरेदी-विक्री करतो. गेल्या वीस वर्षांपासून त्यांच्यात अनेकदा हिरे खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला आहे. हिरे घेतल्यानंतर मुदतीपूर्वीच अजेंशने त्याला पेमेंट केले होते, त्यामुळे त्याला त्याच्यावर प्रचंड विश्वास होता. त्यामुळे तो मागणी करत असलेले हिरे तो त्याला देत होता.
नोव्हेंबर 2022 ते ऑगस्ट 2023 या कालावधीत त्याने वेगवेगळ्या व्यापार्याकडून मोठ्या प्रमाणात हिरे खरेदी केले होते. या हिर्यांची नंतर त्याने होलसेलमध्ये विक्री केली आहे. ऑगस्ट 2023 रोजी त्याच्याकडे अजेंश आला होता. त्याच्याकडे हिर्यांची एक चांगली पार्टी आली आहे. त्याला तो मार्केट भावापेक्षा चांगला भाव मिळवून देईल असे सांगितले. त्यामुळे अजेंशसह त्याची पत्नी काजल यांना 250 कॅरेटचे 1 कोटी 12 लाख 50 हजार रुपयांचे अनेक छोटे हिरे क्रेडिटवर दिले होते.
एक आठवड्यात व्यवहार पूर्ण करुन पेमेंट देतो असे सांगून ते दोघेही निघून गेले होते. हिरे घेतल्यानंतर त्याने त्याचा सिमकार्ड बदलला होता. त्याचा नवीन मोबाईल क्रमांक नसल्याने तो त्याच्या विलेपार्ले येथील गेला होता. मात्र तिथे तो नव्हता. त्याची पत्नी काजलकडे विचारणा केल्यानंतर तिने त्याला प्रतिसाद दिला नाही. पैशांसह हिर्यांची विचारणा केल्यानंतर तिने त्याला मानसिक शोषण केल्याची तक्रार पोलिसांत करण्याची धमकी दिली होती.
क्रेडिटवर घेतलेल्या हिर्यांचा अजेंश आणि काजलने अपहार करुन त्याची फसवणुक केली होती. त्यामुळे त्याने दादर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून या दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अजेंश सिंधवा व त्याची पत्नी काजल सिंधवा यांच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. ते दोघेही पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.